Nashik Grampanchayat : नाशिकच्या 194 ग्रामपंचायतींसाठी 2687 अर्ज दाखल, तर सारस्ते ग्रामपंचायत बिनविरोध
Nashik Grampanchayat : नाशिकच्या (Nashik) 194 ग्रामपंचायतींसाठी 2687 अर्ज दाखल झाले असून सारस्ते ग्रामपंचायत (Grampanchayat Election) बिनविरोध झाली आहे.
Nashik Grampanchayat : नाशिकमधील चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी 605, तर सदस्यांसाठी 2082 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या 88 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर लागलीच जिल्ह्यातील 194 मुदत संपलेल्या व मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला. यामुळे पुन्हा एकदा गुलालची उधळण करण्यास उमेदवार सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार तालुक्यांत सदस्य व सरपंच पदाच्या अर्जाची प्रक्रिया पार पडली. तसेच यांच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकांत तरुणांची चलती दिसुन येत आहे.
दरम्यान त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सुरगाणा आदी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात मंगळवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन सरपंच पदासाठी 86 तर सदस्य पदासाठी 392 अर्ज दाखल केले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन आतापर्यंत सरपंच पदासाठी 274, तर सदस्य पदासाठी 892 असे एकूण 1166 अर्ज दाखल झाले आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. तेथे सरपंच पदासाठी 18, तर 57 अर्ज सदस्यांसाठी दाखल झाले आहेत. तालुक्यातुन सरपंच पदासाठी एकूण 22 तर सदस्य पदासाठी 69 अर्ज दाखल झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अर्ज स्थिती
दरम्यान जिल्ह्यातील चार तालुक्यातील 194 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये अर्ज प्रक्रियेचा कालावधी संपला असून तालुकानिहाय अर्ज प्रक्रिया पार पडली आहे. त्र्यंबकेश्वर सरपंच 151, सदस्य 406 अर्ज दाखल झाले आहेत. इगतपुरी सरपंच 18, सदस्य 57, सुरगाणा सरपंच 286, तर सदस्य 1146 सदस्य पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. पेठ तालुका सरपंच 150 तर सदस्य 473 अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण सरपंच पदासाठी 605 अर्ज तर सदस्य पदासाठी 2082 इतके अर्ज दाखल झाले आहेत.
सारस्ते ग्रामपंचायत बिनविरोध
दरम्याम जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायती पैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे 194 मध्ये एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. दरम्यान सारस्ते गावाने बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे. अन्य औपचारिकता पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोगाकडून सविस्तर घोषणा करण्यात येणार आहे.