Nashik News : नाशिक शहरात 10.2 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमान
Nashik News : गेल्या काही दिवसांपासुन थंडीचा जोर कमी अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) थंडीचा कडाका वाढला असून तापमानात (Temperature) कमालीची घट झाली असून शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारवा पसरल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. नाशिक शहराजवळील निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन थंडीचा (Cold) जोर कमी अधिक प्रमाणात जाणवू लागला असून आज पुन्हा नाशिकसह निफाडचे (Niphad) तापमानात घाटझाल्याचे पाहायला मिळाले. त्यानुसार नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 10.2 अंशावर घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये अवघ्या 7.6 अशांवर पारा येऊन थांबला आहे. तर निफाड तालुक्यातील ओझरमध्ये देखील कमालीची थंडी पडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत आज पुन्हा थंडी जाणवत असून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे.
नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला असताना काल पुन्हा थंडीने आगमन केले. रविवारी नाशिक शहराचे तापमान हे 10 अंशावर घसरले होते, त्यानंतर आजचा पारा किंचितसा वाढून शहरात 10.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्यात आज 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्याने कुठे शेकोट्या, कुठे जिम, जॉगिंग ट्रकला गर्दी पाहायला मिळत आहेत. तर अनेकजण थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करत आहेत. दरम्यान नोव्हेंबर संपायला आला तरी नाशिकमध्ये कडाक्याची थंडी जाणवत नव्हती. मागील चार दिवसांमध्ये तापमानामध्ये कमी अधिक प्रमाणात थंडी वाढ होत आहे. कारण शनिवारी 13.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर आदल्या दिसव्ही म्हणजेच शुक्रवारी पारा हा 12.4 अंशावर होता. मात्र शनिवारी थेट दहा अंशावर घसरला. त्यामुळे पुन्हा शहरासह ग्रामीण शेकोट्या पेटत असून शहरात जिम, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पहायला मिळाली. दरम्यान नाशिक शहरातील मागील पाच दिवसांची तापमानाची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, कमी अधिक फरकाने तापमानात घट झाली आहे. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिक उन्हाचा चटकेही अनुभवयास येत आहे. त्यामुळे यंदाची थंडी हि सलग नसल्याने थंडीचा फील येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाशिक शहरासह जिल्ह्यात हुडहुडी
दरम्यान मागील आठवड्यात नाशिक शहराचे किमान तापमान १५ अंशाच्या पुढे सरकले होते. त्यानंतर हळुहळु किमान तपमानाचा पारा खाली येण्यास सुरूवात झाली; मात्र अचानकपणे शनिवारीपासून तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज 10 अंशावरून थेट 10.2 अंशावर पारा येऊन ठेपल्याने सकाळपासून हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासूनच पारा घसरत असल्याने नाशिककरांनी स्वेटर परिधान करण्यास सुरवात केली आहे. नाशिककरांना हुडहुही भरू लागल्यामुळे जिम क्रीडांगणे, जॉगिंग पार्क, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.