Nashik municipal corporation elections 2022 : नाशिक महापालिकेची ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, पहा कुणाचा पत्ता कट तर कुणाची एन्ट्री?
Nashik municipal corporation elections 2022 : नाशिक (Nashik) महापालिकेच्या निवडणुकांसाठी (NMC Election) ओबीसी आरक्षण (OBC) सोडतसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
Nashik municipal corporation elections 2022 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तसेच तब्बल दीड वर्षांपासून घोळत असलेल्या नाशिक (Nashik) महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Nashik municipal corporation elections 2022) यापूर्वीच्या सोडतीत बदल करून आता ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सोडतसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण (Women Reservation) सोडत काढण्यात आली आहे. ओबीसींच्या 35 तर सर्वसाधारण महिला गटासाठी ही 35 जागांची सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षणासाठी सोडतीची प्रक्रिया राबविण्यात आली.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तसेच तब्बल दीड वर्षांपासून घोळत असलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी यापूर्वीच्या सोडतीत बदल करून आता ओबीसी आरक्षण सोडतसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
असे आहे ओबीसी आरक्षण
नियम 6 नुसार 8अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नेमून देण्यात आली आहे. तर 5 अ 6 अ, 8 अ ब, 9 अ, 10 अ, 16 अ, 17अ, 18अ, 19अ, 21अ, 29अ, 30अ, 31अ, 32अ, 33अ, 36 अ, 37अ 38 अ 40 अ या जागा थेट नेमून दिल्या आहेत. तर उर्वरित जागांमधून १४ जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये 04 ब, 39 ब, 24 ब, 25 ब, 23 ब, 42 ब, 15 ब, 22 ब, 41 ब, 20 ब, 35 ब, 14 ब, 43 ब, हे प्रभाग ओबीसी जागांसाठी राखीव आरक्षित करण्यात आले आहेत.
महिला आरक्षण (ना.मा.प्र ओबीसी)
ओबीसी आरक्षण सोडतीतील पुढील आठ जागा महिलासाठी थेट आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रभाग 8अ, प्रभाग 15ब, प्रभाग 20ब, प्रभाग 23ब, प्रभाग 24ब, प्रभाग 25ब, प्रभाग 39ब, प्रभाग 42ब. तर उर्वरित दहा जागा या सोडतीद्वारे काढण्यात आल्या. दरम्यान प्रभाग क्र. अनुक्रमे 5, 6, 9, 10, 13, 16, 17, 18, 19, 21, 29, 30, 31, 32, 33, 36, 37, 38, 40 या 19 प्रभागांमधून दहा जागा सोडतीद्वारे काढण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे 9अ, 33अ, 30अ, 10अ, 18अ, 19अ, 29अ, 38अ, 32अ, 21अ या प्रभागांवर महिला ओबीसी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण
सर्वसाधारण महिलांच्या 34 जागा असून 25 जागा या नेमून देण्यात आल्या आहेत. तर नऊ जागा या सोडतीद्वारे काढण्यात आल्या. दरम्यान 34 जागांपैकी 25 जागा नेमून देण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे प्रभाग क्र. अनुक्रमे 8क, 1ब, 3ब, 5ब, 6ब, 13ब, 16ब, 28ब, 31ब, 36ब, 40ब. ज्या प्रभागात दोन जागा अराखीव असतील त्याठिकाणी एक महिला निवडणून देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार अराखीव जागा असलेले प्रभाग : प्रभाग 2ब, 8क, 9ब, 10ब, 12ब, 18ब, 19ब, 21ब, 29ब, 30ब, 32ब, 33ब, 38ब हे आहेत.
तर 4क, 7क, 11क, 14क, 15क, 20क, 22क, 23क, 24क, 25क, 26क, 27क, 35क, 39क, 41क, 42क, 43क, 44क प्रभागातून सर्वसाधारण महिलांच्या 9 जागांची निवड सोडतीद्वारे करण्यात आली. त्यात प्रभाग 14क, 27क, 15क, 39क, 44क, 23क, 20क, 35क, 7क यांचा समावेश आहे.