Gulabarao Patil : राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये, उद्या आदित्य ठाकरेंना मुल होईल : मंत्री गुलाबराव पाटील
Gulabarao Patil : उद्धव ठाकरेंसारख्या अभ्यासू व्यक्तीने अशी टीका करणे निषेधार्ह असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Gulabarao Patil : दीड वर्षाच्या मुलावर उद्धव ठाकरे (Udhhav Thakceray) यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीने टीका करणे हे निषेधार्ह आहे, आणि चुकीचे असल्याचे आणि राजकारणाची (Politics) पातळी इतक्या खाली जाऊ नये अशा प्रकारची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आह. दीड वर्षाच्या मुलावर टीका करणे अतिशय चुकीचे असून उद्या आदित्य ठाकरे याना ही मूलबाळ होणार आहे, त्यांनी अशी टीका करायला नको होती, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
यंदा प्रथमच मुंबईत (Mumbai) दोन दसरा मेळावे (Dasara Melava) जनतेने याची देही याची डोळा अनुभवले. दरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सर्वावर सडकून टीका केली. यावेळी एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) बोलताना म्हणाले कि, बाप, मुलगा आता नातूही राजकारणात अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या सोबत 35 वर्षे जवळ राहिलोय पण उद्धव साहेब घसरताना मी पाहिले नाही. त्यांच्यासारख्याअभ्यासू माणसांनी एक छोट्याशा दीड वर्षाच्या बाळावर अशी टीका करावी, हे चुकीचं आहे. आदित्यलाही मुलं होतील, मग? राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सहभागी झालो, त्याच्यावर काहीच म्हणणं नव्हतं. ज्यावेळेस आम्ही सूचना केल्या की आता होका यंत्र चालू झाला आहे, आता हवामानाचा अंदाज बदलला आहे. सोसाट्याचा वारा येणार आहे, पाऊस पडणार आहे. हे माहीत असूनही सुद्धा आपण जर निर्णय बदलत नसाल तर मला तरी असं वाटते की राजकीय क्षेत्रामध्ये सध्या जगामध्ये आणि देशांमध्ये हे मान्य केलं आहे. सार्वभौम निर्णय घेण्याची पार्टी चालेल. एकतर्फी निर्णय घेणारी पार्टी चालणार नाही. जिथे सर्व सार्वजनिक निर्णय घेतला जातील, कमिटी निर्णय घेईल असेच पक्ष तरतील, असे मोलाचा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिला.
सध्या सेनेच्या दोन गटात धनुष्य बाण चिन्ह कोणाचे या विषयावर चर्चा सुरू आहे मात्र खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांची संख्या बळाचा विचार करता धनुष्य आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. धनुष्यबाण लोकप्रतिनिधींची संख्या, खासदारांची संख्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या या तिघांच्या आकडेवारीवर ठरणार आहे. शिवाय कालचा दसरा मेळाव्यातील गार्ड सर्वकाही सांगून जाते. शिंदे सरकारला, आम्हाला पाठींबा देणाऱ्या जनरल लोकांची संख्या सिद्ध करून देते की धनुष्यबाण कोणाला मिळणार. संख्येचा आधार, लोकसंख्येचा आधार, लोकप्रतिनिधी आणि जनतेचा पाठिंबा या तिघा गोष्टींकडे नजर मारली तर धनुष्यबाण आम्हाला मिळाला पाहिजे, अशी ठोस भूमिका मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
एकतर्फी निर्णय घेणाऱ्या पार्ट्या चालणार नाहीत.
भाजप ने खंजीर खुपसला मुळेच आपण आघाडी सोबत गेल्याचे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात म्हटल होत त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे की त्या बद्दल आमचे काही म्हणणे नव्हते मात्र हवामान बदलल आहे, याचा अंदाज आल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होत मात्र त्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले,सध्या राजकीय क्षेत्रात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन सार्वभौम निर्णय घेणे आवश्यक ठरते आणि अशाच पार्टी चालणार आहे एकतर्फी निर्णय घेणाऱ्या पार्ट्या चालणार नाहीत,हे या लोकांनी सिद्ध केले आहे. असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. अमित शहा हे राज्या राज्यात जाऊन काड्या करतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हणाले कि अमित शहा गृहमंत्री असल्यानं त्यांचं कामच असल्यानं ते काड्याच करतील अस मिश्किलपने म्हणत उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे.