Nashik Crime : नाशिकमध्ये चोरांचा कहर, एटीएम राहील बाजूला! डोळ्यांत मिरची टाकून वृद्धाला मारहाण
Nashik Crime : नाशिक पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) एटीएम फोडण्याच्या (ATM Theft) उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वृद्धाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात लुटीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कालच शहरात नागासाधूंच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी वृद्धांना लुटल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिक पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) एटीएम फोडण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वृद्धाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
नाशिक पुणे महामार्गावरील पळसे (Palse) गावानजीक मध्यरात्रीची सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पळसे गावाजवळ एटीएम बाहेर झोपलेल्या 60 वर्षीय वृद्धाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जबर मारहाण केली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
दरम्यान पळसे गावानजीक एका बँकेचे एटीएम (Bank ATM) असून मध्यरात्री गावातील वृद्ध झोपले होते. अचानक रात्रीच्या सुमारास एटीएम फोडण्याच्या उद्देशाने चोरटे आले. यावेळी एटीएम जवळ वृद्धाला झोपलेले पाहून त्यांनी चोरीच्या प्लॅन फिस्कटला जाईल. या उद्देशाने त्यांनी लांबून वृद्धावर गल्लोरच्या साहाय्याने दगडफेक केली.
एटीएम जवळ झोपलेल्या वृध्दाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी एटीएमजवळ जात वृद्धाला जबर मारहाण केली. घटनेत 60 वर्षीय दिनकर गायधनी गंभीर जखमी झाले. यानंतर चोरांनी येथून पळ काढला. जखमी गायधनी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पळसे गावातली एटीएम फोडण्याच्या उद्देशाने आलेली दोन चोरट्यांनी वृद्धाला मारहाण केली. या सर्व झटापटीचा व्हिडिओ सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे या घटनेवरून दिसून आले.
नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस
गेल्या काही दिवसांत चोरी, लुटीच्या घटना किरकोळ बाब झाली आहे. रात्री बेरात्री अशा प्रकारे घटना उघडकीस येत असल्याने नागरिकाकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.