Nashik Rain Record : नाशिक शहरात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, तब्बल 81 वर्षांनंतर जुलैत 'धो-धो'
Nashik Rain Record : नाशिक शहरात (Nashik) जुलै महिन्यात झालेल्या पावसाने 81 वर्षांचा (Record Break Rain) विक्रम मोडीत काढला असून रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Nashik Rain Record : नाशिकमध्ये (Nashik) जुलै महिन्यात झालेल्या पर्जन्याने 81 वर्षांनी विक्रम मोडीत (Record Break Rain) काढला आहे. दरम्यान 1941 साली जुलै महिन्यात 549. 5 मिलीमीटर पाऊस (Heavy Rain) नाशिक शहरात (Nashik) कोसळला होता. त्यानंतर यंदा 2022 साली म्हणजेच जवळपास 81 वर्षांनंतर 550.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अद्यापही जुलै महिन्यापर्यंत काही दिवस बाकी असल्याने अजूनही पाऊस होण्याची शक्यता आहे.
जूनच्या महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडूंब भरली, नदी नाले ओसंडून वाहू लागली. तर अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर काही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा तयार झाला आहे. यावर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली आहे. या जोरदार पावसाने तब्बल 81 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
नाशिक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झाला. तत्पूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने भीषण पाणीटंचाई सुरु होती. शिवाय अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवस सुरु असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. आणि टाळ गाठलेली धरणे आता ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक शहरात जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
81 वर्षाचा विक्रम मोडीत
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. दमदार पावसाच्या हजेरीने जिल्हाभरात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी घरांच्या नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. मागील काही दिवसात धुवांधार पाऊस झाल्याने तब्बल 81 वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. नाशिक जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, मात्र गंगापूर मधून आज विसर्ग घटविला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
गंगापूरमधून विसर्ग घटविला
नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला, गोदावरीची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. पंधरा दिवसांनंतर हा विसर्ग थांबविण्यात आला असून सध्या गंगापूर धरणातील पाणी साठा ६८ टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने हा विसर्ग घटविण्यात आला आहे.