Nashik News : नाशिक शहर पोलिसांकडून 'भाईगिरी'वर कारवाई, कोम्बिंग ऑपरेशन जोरात
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी (Nashik Police) अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिल्याने शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांत खून (Murder) तसेच गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने शहरात गेली काही दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्यानुसार विविध आस्थापना, गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हेगारांच्या तपासासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 49 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 31 तडीपार गुन्हेगारांना तंबी देण्यात आली आहे. जवळपास एका दिवसाच्या मोहिमेत 161 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या मोहिमेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वाढलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहे.
दरम्यान मागील काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यांत आठ खुनाच्या घटना उघडकीस आल्याने शहर हादरले आहे तर जिल्ह्यातील अनेक भागातही गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. तर घरफोडी, मारहाण आदी घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी परिमंडळ-1 हद्दीतील पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापुर व मुंबईनाका पोलीस ठाणेनिहाय सहा ते सात पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास १६१ जणांवर कारवाई करण्यात आली.
अशी आहेत पथके
दरम्यान या कारवाईत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येते. यामध्ये पायी पेट्रोलींग पथक, कोम्बींग ऑपरेषन पथक, टवाळखोर कारवाई पथक, गुन्हेगार चेकिंग पथक, अवैध दारू विक्री पथक, अवैध जुगार प्रतिबंध पथक, हत्यार प्रतिंबधक कारवाई पथक, रेकॉर्डवरील आरोपी तपासणी पथक अशी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून पायी पेट्रोलींग, कोम्बींग ऑपरेशन, टवाळखोर कारवाई, गुन्हेगार चेकींग, हत्यार प्रतिबंधक कारवाई, पाहीजे आरोपी तपासणी, रेकॉर्डवरील आरोपी तपासणी, तडीपार आरोपी तपासणी व इतर कारवाई करण्यात आली आहे.
कोम्बिंग ऑपरेशनचे सातत्य
एकीकडे शहरासह जिल्ह्यात गुन्हे वाढत असून यासाठी नाशिक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून योग्य त्या उपाययोजना आवश्यक आहेत. गुन्हेगारांवर अंकुश अशा पद्धतीचे कोम्बिंग ऑपरेशन वेळोवेळी राबविण्यात येऊन त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमधून संबंधित गुन्हेगारांना सुधार योजनेच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर काढणे महत्वाचे आहे. जेणेकरून शहरात व जिल्ह्यात गुन्हे कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सात्यत्याने पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन होणे आवश्यक आहे.