(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Virus Cases : नाशिक जिल्हा परिषदेकडून 1 लाखाहून अधिक लसीं उपलब्ध, अशी घ्या जनावरांची काळजी
Lumpy Virus Cases : नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील लम्पी (Lumpy) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 1 लाखाहून अधिक गोट पॉक्स लस (Goat Pox Vaccine) मात्रा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
Lumpy Virus Cases : राज्यातील जळगांव (Jalgaon), अहमदनगर, अकोला (Akola), पुणे, धुळे (Dhule), लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (Kolhapur) तसेच नाशिक जिल्ह्यांतील काही भागात सद्यस्थितीत गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक (Nashik) यांचेमार्फत जिल्हा परिषद सेस निधीतून सध्या 1,05,300 गोट पॉक्स लस (Goat Pox Vaccine) मात्रा तातडीने उपलब्ध करण्यात आलेली आहे.
सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे यांचेकडील नमुने तपासणी अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील पांगरी व दुसंगवाडी, ता. सिन्नर या गावांमधील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे रोग नमुने लम्पी रोगाकरीता पॉझिटिव्ह आलेले होते त्यानुसार पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे त्या गावांच्या 5 कि.मी परिसरातील पांगरी खुर्द, मिठसागरे, फुलेनगर, मलढोन, वावी, पिंपरवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी व सायाळे येथील एकूण 7800 गोवर्गिय जनावरांना लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.
दरम्यान हा आजार गोचिड / गोमाश्या / डास / मच्छर यांच्या चाव्याने पसरत असल्याने या आजारास प्रतिबंध करणे तात्काळ शक्य होण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगामधून प्रत्येक गावात गोचिड / गोमाश्या / डास / मच्छर यांच्या निर्मुलनासाठी फवारणीचे औषधे उपलब्ध करून देण्याबाबत यापुर्वीच जिल्हातील सर्व ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना मा. लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांचेमार्फत आदेशित केलेले आहे.
जिल्हयात ज्या गावात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावातील व गावाच्या 5 कि.मी. परिसरातील सर्व गोवर्गीय जनावरांमध्ये तात्काळ लसीकरण मोहिम राबविण्यात येईल. मा. सचिन्द्र प्रतापसिंग, आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य आँध पुणे यांचे कडील दिनांक 10.07.2022 च्या पत्रानुसार लसीकरणासाठी शासनामार्फत कुठल्याही प्रकारचे शुल्क आकरण्यात येऊ नये याबाबत क्षेत्रिय स्तरावर कळविलेले आहे व त्यानुसार लम्पी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी पशुपालकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी आवश्यकता भासल्यास जिल्हयातील संबंधित पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे जेणेकरून रोग प्रादुर्भाव तात्काळ आटोक्यात आणता येईल.
जिल्हा परिषद सेस फंडातून तातडीने हा रोग तात्काळ नियंत्रणात यावा या करीता 1.05.300 गोट पॉक्स लस मात्रा उपलब्ध करण्यात आलेली आहे. बाधित गावापासून 5 कि.मी. च्या परिसरात येणान्या गावातील तीन महिने वयोगटावरील वरील सर्व गोवर्गिय जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्या मार्फत आहे. लसीकरण करून घ्यावे व रोग नियंत्रणात पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गजे यांनी केले आहे.
प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लॅम्पी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकिय संस्थेस, प्रशासनास देणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली आहे.