Krishna Janmashtami 2022 : 'मंदिरात आल की कृष्णाला भेटल्या सारखं वाटत! नाशिकचं 197 वर्ष जुने मुरलीधर मंदिर'
Krishna Janmashtami 2022 : नाशिकच्या (Nashik)197 वर्षांची परंपरा असलेले मुरलीधर मंदिर (Murlidhar Mandir) आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) सुंदर रित्या सजले आहे.
Krishna Janmashtami 2022 : आम्ही पाच सहा वर्षांच्या असल्यापासून या मंदिरात येतो आहे, तेव्हापासून ते आजपर्यत या मंदिराशी आमचं जिव्हाळ्याचं नात तयार झाल असून मंदिरात आलं की कृष्णाला भेटल्यासारख वाटतं, अशी प्रतिक्रिया नाशिकच्या (Nashik) मुरलीधर मंदिरात (Murlidhar Mandir) दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेने दिली.
आज राज्यभरात जरी कृष्ण जन्माष्टमीच्या (Janmashtami) निमित्ताने उत्साहाचे वातावरण असून मागील दोन वर्षे हा सोहळा ऑनलाईन झाल्याने भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. मात्र यंदा मोठ्या उत्साहात सोहळा साजरा होतो आहे. नाशिक शहरातील अनेक मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असून 197 वर्ष जुन्या असलेल्या मुरलीधर मंदिरातही भाविकांनी आज सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली असून श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करत आहेत.
नाशिक (Nashik) शहरातील प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारातील मुरलीधर मंदिर हे पुरातन मंदिर असून 1825 साली गणराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरीच्या (Godawari) तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर लाकडी जुन्या ठेवणीतील बनवलेलं आहे. मुरलीधर मंदिरात असलेली श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक असून श्री कृष्णाची बालमूर्ती आहे.
गेल्या दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) बंद असलेले दर्शन काही महिन्यांपासून खुली झाली आहे. दररोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. तर कालपासून नाशिककरांसह राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी येत आहे. मंदीर सकाळी भाविकांसाठी 7 वाजता उघडते तर रात्री 10 वाजता बंद होते, त्याचबरोबर सकाळी महाआरती होऊन विविध कार्यक्रमाची रेलचेल मंदिरात आरोजन करण्यात आल्याची माहिती मंदिरातील पुजारी संदेश संत यांनी दिली आहे.
197 वर्षांची परंपरा
नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारातील (Saraf Bajar) मुरलीधर मंदिर हे पुरातन मंदिर असून 1825 साली गणराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आहे. नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर लाकडी जुन्या ठेवणीतील बनवलेलं आहे. मुरलीधर मंदिरात असलेली श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक असून श्री कृष्णाची बालमूर्ती आहे. मंदिरात सकाळी व सायंकाळी 8 वाजता आरती होत असते. आरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात.
कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला!
दरम्यान जन्माष्टमी निमित्त अनेक भाविक भक्त मुरलीधर मंदिरात दर्शनासाठी येत आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविक म्हणाल्या कि, या मंदिरात अगदी लहान असताना पाच ते सहा वर्षांची असल्यापासून असून इथे आल्यावर की एक वेगळीच ऊर्जा मिळते.मंदिरातील कृष्णाची विलोभनीय मूर्ती पाहून भगवान श्री कृष्णाला भेटल्या सारखं वाटत, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.