Nashik News : 'मेरा रंगदे बसंती चोला', नाशिक मनपा अधिकाऱ्यांमध्ये देशभक्तीचा फिव्हर
Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrit Mahotsav) नाशिकमध्ये (Nashik) मनपा प्रशासनाच्या वतीने कालिदास कला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrit Mahotsav) नाशिकमध्ये (Nashik) मनपा प्रशासनाच्या वतीने कालिदास कला मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. यावेळी नाशिक मनपा (Nashik NMC) कर्मचाऱ्यांनी सहभागी होत गोड गीतासह देशभक्तीसह गाणी गायली.
नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवनं इथे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. मनपाच्या अग्निशमन दल विभागाने आयुक्तांना सलामी दिली. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रगीत झाल्यावर आयुक्तांच्या हस्ते तिरंग्याचे फुगेही आकाशात सोडण्यात आले. महापालिकेचे सगळे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.ध्वजारोहण कार्य़क्रमानंतर महाकवी कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरीचं प्रदुषण टाळण्यासाठी जनजागृतीचा भाग असलेल्या गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शहरातील सर्व शाळांमध्ये गोदा गीत म्हटले जाणार आहे. मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांची ही संकल्पना आहे. या गीताचे संगीतकार संजय गीते, गायिका श्रावणी गीते आणि गीतकार सुरेखा बो-हाडे यांचा महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ध्वजारोहण कार्य़क्रमानंतर महाकवी कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परीषदेच्या सीईओ लिना बनसोड, रोटरीयन प्रांतपाल आशा वेणुगोपाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परीषदेच्या सीईओ लिना बनसोड, रोटरीयन प्रांतपाल आशा वेणुगोपाल, अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रुजावी, या उद्देशाने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडत आहेत.
देशभक्तीपर गीतांनी जिंकली मने
सांस्कृतिक कार्य़क्रमात देशभक्तीपर गीते सादर झाली. प्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर तसेच आयएमए आणि रोटरीच्या सदस्यांनी गीते सादर केली. त्याशिवाय महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगररचना विभागातील उपअभियंता रविंद्र बागुल, नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, सिडको विभागीय अधिकारी मयुर पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी दीपिका मारु यांनीही आपल्या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकली. सायक्लॉन डान्स अकॅडमीच्या नृत्याविष्कारालाही दाद मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
