(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये 'सोनेरी मिठाई'ला सोन्याचा भाव, किंमत ऐकून थक्क अवाक्
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) तर राखी बांधण्याचा (Rakshabandhan) सोनेरी क्षण कायमस्वरुपी लक्षात रहावा याकरिता सागर स्वीट्सने खास सोनेरी मिठाई (Golden Mithai) तयार केली आहे.
Nashik News : बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण आज देशभर उत्साहात साजरा होत असून या सणाच्या पार्श्वभूमिवर मिठाई व्यावसायिकांची देखिल मोठी उलाढाल होती आहे. नाशिकमध्ये (Nashik) तर राखी बांधण्याचा सोनेरी क्षण कायमस्वरुपी लक्षात रहावा, याकरिता सागर स्वीट्सने खास सोनेरी मिठाई (Golden Mithai) तयार केली आहे. विशेष म्हणजे सोनेरी मिठाईची किंमत ही तब्बल 13 हजार 600 रुपये किलो एवढी आहे. एवढी किंमत असुनही सोनेरी मिठाईला मागणी वाढली आहे.
श्रावण महिन्यातील (Sawan Mahina) बहीण भावाच्या नाते सांगणारा रक्षाबंधन सणाला नाशिक नगरी सजली आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) बहीण भावला रक्षा बंधन साजरी करता आली नाही. मात्र यंदा मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरी करण्यात येत आहे. नाशिकमध्ये रक्षाबंधन पवित्र सणासाठी बाजार पेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात आकर्षक, सुंदर आणि सुबक राख्या बाजारात आल्या असून तरुणींची लगबग पाहायला मिळते आहे. त्यातच मिठाईची दुकाने देखील सजल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक शहरातील अनेक मिठाईची दुकाने सजली असून मात्र सोनेरी मिठाईला विशेष मागणी आहे. सण कुठलाही असो त्यात गोडधोड असतेच. आता रक्षाबंधनाचा सण म्हटल्यावर मिठाईला फार महत्व आहे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची विक्री यादरम्यान होत असते. नाशिकमध्येही अशाच प्रकारच्या एका 'सोनेरी मिठाईने शहरवासीयांना भुरळ घातली आहे. नाशिकमधील प्रसिद्ध अशा सागर स्वीटमध्ये सोन्याचा वर्क असलेली मिठाई तयार केली आहे. हि मिठाई ग्राहकांना आकर्षित करत असून 3400 रुपये पावशेर असल्याने ग्राहकांना सोनेरी मिठाईची चव चाखायची असल्यास खिसा मोकळा करावा लागणार आहे.
राख्यांचीही रेलचेल
नाशिकच्या कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार आदी परिसरात रक्षाबांधनानिमित राख्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कॉलेजरोड परिसरात राखी मार्केटमध्ये एक रुपयांपासून ते आठशे रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये किड्स राखी, डायमंड राखी, चंदन राखी तसेच अमेरिकन डायमंड राख्यांना विशेष पसंती दिली जात आहे.
सोनेरी मिठाईत स्पेशल काय?
नाशिकच्या सागर स्वीटमध्ये सोनेरी मिठाई उपलब्ध झाली असून या मिठाईला मोठी मागणी आहे. हि मिठाई तयार करण्यासाठी केसर, अफगाण ड्रायफ्रुट्सचा वापर करण्यात आला असून यावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा देखिल देण्यात आला आहे. दरम्यान या मिठाईची किंमत 14 हजार रुपये किलोच्या आसपास आहे. सोन्याची किंमत वाढल्याने मिठाई देखील महागल्याचे विक्रेते सांगत असून या गोल्डन मिठाईला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे..