एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानावर वनविभागाची धाड, दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव

Nashik News : नाशिकच्या (Nashik) रविवार कारंजा वरील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात (Ayurvedic Shop) वनविभागाने धडा टाकली असून या कारवाईत वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आल्याची धक्कादायक समोर आली आहे.

Nashik News : नाशिकच्या (Nashik) रविवार कारंजा (RK) वरील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात वनविभागाने  (Forest Department) धडा टाकली असून या कारवाईत वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आल्याची धक्कादायक समोर आली आहे. सध्या या दुकानात आणखी तपास करण्यात असून नेमके अवयव कुठल्या वन्यप्राण्याचे याचा तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. 

नाशिक शहरातील रविवार कारंजा हा परिसर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे,. त्यातही तेली गल्लीतील दगडू तेली या नावाने असणाऱ्या आयुर्वेदिक दुकानांत नागरिकांची नेहमी गर्दी असते. अनेकदा नाशिकबाहेरील नागरिक या ठिकाणी आयुर्वेदिक औषधांसाठी येत असतात, मात्र येथील काही दुकानांत आयुर्वेदिकच्या नावाखाली वन्यप्राण्यांचे अवयव विक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार रविवार कारंजा परिसरात तेली गल्लीतील दीपक सुरेश चांदवडकर यांच्या मालकीच्या सुकामेवा व काष्ट औषधी दुकान नंबर तीन मध्ये वनविभागाने धाड टाकली. 

वनविभागाला वन्यप्राण्यांचे अवयव विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरएफओ विवेकी भदाणे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी, व राउंड स्टाफ च्या पथकाने दुकानावर छापा टाकला. या कारवाईत वन्यप्राण्यांचे विविध अवयव आढळून आल्याचे निदर्शनास आले. धाडीत मिळून आलेले वन्य प्राण्यांचे अवयव अधिक तपासासाठी प्रयोग शाळेत आले पाठवण्यात आले आहेत. तसेच वनखात्याने वन्यजीव संरक्षण च्या नुसार दीपक चांदवडवर यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान आरएफओ विवेक भदाणे म्हणाले कि, सध्या कारवाई करण्याचे काम सुरु असून तसेच वन्यप्राण्यांचे अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांची शहनिशा कर्णयचे काम सुरु आहे. शिवाय अशा पद्धतीने कोणी वन्यप्राण्यांची तस्करी करत असेल, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

तर होऊ शकतो तुरुंगवास 
वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये अनेक वन्यप्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा वन्यजीवांची त्यांच्या अवयवांसाठी अथवा अन्य कोणत्याही उद्देशाने शिकार करणे गंभीर गुन्हा आहे. या प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला सात वर्षांचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड अथवा दोन्ही प्रकारची शिक्षा गुन्ह्याचे स्वरूप बघता न्यायालयाकडून सुनावली जाऊ शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Embed widget