एक्स्प्लोर

Nashik Crime : भय इथले संपत नाही, नाशिक शहरात रक्तपात वाढताेय!

Nashik Crime : आध्यात्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) शहरात अवघ्या 24 तासांत तीन खून (Murder) झाले आहेत. यामुळे नाशिकमध्ये आता रक्तपात वाढताेय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nashik Crime : नाशिकसह राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर सारख्या स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांत गुन्हेगारी वाढत आहे. नाशिक शहरांत मागील 24 तासांत तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सदर घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल का? असा प्रश्न उपस्थित झाला असून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पोलिसांना पूर्ण अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक ही मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्यटक, भाविक आदींसह रोजगारासाठी इतर राज्यातील नागरिक नाशिक शहारत दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे क्षेत्र होतंय कि काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. नाशिकमध्ये अवघ्या 24 तासांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यासह वाहनांची तोडफोड-जाळपोळ, घरफोडी, मारहाण अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना, अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान गुरुवारी नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एका यश गांगुर्डे युवकाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सुरु होतो न होतो तोच पूर्णिमा बस स्टॉपवर मध्यरात्री पुण्यातील एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. तर लागलीच हि घटना झाल्यानंतर आनंदवल्ली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैरे या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासाअंती त्याचा खून आल्याचे निष्पन्न झाले. याचा खून करण्यात आला आहे. म्हणजे जवळपास 24 तासांत तीन खून शहरात घडले आहेत. यावरून दिसून येते कि शहरातील रक्तपात किती वाढतो आहे. यामुळे नाशिक शहरात पोलिसांचे वर्चस्व आहे कि गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर कोण घालणार, पोलीस काय करताय? सामान्य नागरिकांची सुरक्षितता? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 

एकूणच नाशिकमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुंड, तडीपार गुंडांकडून दिवसाढवळ्या घडणारे गुन्हे, घरफोडीच्या घटना, किरकोळ मारहाण, लूटमार यामुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मोठ्या शहरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत, तरच नागरिकांचे जगणे सुसह्य होऊ शकेल.

जीवे मारण्याची प्रवृत्ती
दरम्यान अशा गुन्हेगारीच्या घटनांवरून लक्षात येते कि, क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी नाशिक सह इतरही महत्वाच्या शहरात गुन्हेगारी वाढते आहे. यातील काही घटनांमध्ये पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget