Nashik RSS Sanchalan : नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन, संचलन मार्गावर रांगोळीसह फुलांची उधळण
Nashik RSS Sanchalan : नाशिकमध्ये शहरात तब्बल 21 ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन (Pathsanchalan) करण्यात आला
Nashik RSS Sanchalan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) स्थापना दिवस अर्थातच विजयादशमी (Vijayadashami) निमित्ताने नाशिक (Nashik) शहरात तब्बल 21 ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन (Pathsanchalan) करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी संपूर्ण शहरातील गट स्तरावर काढण्यात आलेलं संचलन यंदा मात्र नगर स्तरावरून काढण्यात आले. दुपटीहून अधिक स्वयंसेवक या पथसंचालनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघातर्फे आज नाशिक शहरातील 21 ठिकाणी पथसंचलन करण्यात आले दरवर्षी गट स्तरावर होणारे पथसंचलन यंदा नगर स्तरावर झाले. यातील 19 पथसंचलन सकाळी सात वाजता तर दोन नगरांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास पतसंचलन करण्यात आले यावेळी सेवक सदंड संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन व पथसंचलन आयोजित करण्यात येते.
सकाळच्या सुमारास ध्वजाला वंदन करून संचालनास सुरुवात होते त्यानंतर पतसंचालनाला विविध ठिकाणी सुरुवात होते दरम्यान नाशिक शहरात संघाची 22 नगरी व सहा गट आहेत त्यातील 21 नगरांमध्ये संचलन पार पडले दरवर्षी गट स्तरावर सहा ठिकाणी होणारे संचलन यंदा पार पडले. त्यासाठीची संपूर्ण तयारी मागील आठवड्याभरापासून सुरू होती. रविवारी कारंजा नगरच्या पथसंचलन सकाळी सात वाजता बिडी भालेकर मैदानावरून प्रारंभ झाला.
त्याचबरोबर शहरातील गुरुगोविंद सिंग नगर येथील गावणे मैदान, खुटवड नगर येथील श्री वरद गणपती मैदान, पंचवटीतील नगर साई मंदिर मधुबन कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले नगर, मखमलाबाद नगर, सातपूर नगर, मुक्तिधाम नगर आदी परिसरात हे पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. कोरोना निर्बंधामुळे 2019 राष्ट्रीय संघाचे पथ संंचलन होऊ शकले नव्हते. गतवर्षी रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने गटस्तरावर पथसंचलन करण्यात आले होते. यंदा निर्मत नमुक्त उत्साहात साजरा होत असल्याने नगर स्तरावर देखील संचलन करण्यात आले. दरम्यान नाशिकच्या शहरातील सहाही विभागांमधून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा संचलन निघून त्यामध्ये 2400 स्वयंसेवक सहभागी झाले होते. तर यंदा ही संख्या दुपटीने वाढली असल्याचे पाहायला मिळालं.
या ठिकाणी झालं पथसंचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी पथ संचलन शहरात 21 ठिकाणी पार पडले आहे. यामध्ये गुरुगोविंदसिंग नगर, खुंटवडनगर, रविवार कारंजा, पंचवटी मधुबन काॅलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक कथडा, माणेक शॉ नगर, महात्मा फुलेनगर, मखमलाबाद, सातपूर, मुक्तिधाम नाशिकरोड आदी परिसरासह शहरातील इतर ठिकाणी मोठ्या उत्साहात हे पथ संचलन करण्यात आले. यावेळी संचलन मार्गावर महिलांकडून रांगोळीसह फुलांची उधळणं करण्यात आली.