नाशिक जिल्हा परिषदेच्या सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धेवर शिक्षकांचा आक्षेप, प्रवेशिकांचा सावळा गोंधळ
Nashik Zilla Parishad News: शिक्षकांनी या स्पर्धांबाबत आक्षेप घेतला असून नेमकी स्पर्धा कशी राबवावी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर यातील सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा वादात सापडली आहे.
Maharashtra Nashik Zilla Parishad News: नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सेल्फी अशी स्पर्धा भरवली गेली आहे. मात्र या स्पर्धेला प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. शिवाय शिक्षकांनी या स्पर्धांबाबत आक्षेप घेतला असून नेमकी स्पर्धा कशी राबवावी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर यातील सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा वादात सापडली आहे.
जागतिक शौचालय दिनानिमित्त युनिसेफ आणि CYDA यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये पथनाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, सेल्फी विथ टॉयलेट स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आहेत. मात्र स्पर्धांमुळे शिक्षकांची मात्र अडचण झाली आहे. कारण अनेक शाळांमध्ये शौचालयाची अवस्था प्रचंड बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये सेल्फी काढण्यासाठी शौचालयाची स्वच्छता करणार कोण? असा प्रश्न अनेक शिक्षकांनी विचारला आहे. शिवाय जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या परिपत्रक नेमकं काय आहे आणि शिक्षकांनी स्पर्धा कशी अंमलात आणावी असे प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे या स्पर्धांसाठी अद्यापपर्यंत किती प्रवेशिका आल्यात, हे सांगणे देखील मुश्किल झाले आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आधीच अनेक इतर कामे असताना आणखी एक काम शिक्षकांना देण्यात आल्याने शिक्षकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमट आहेत. शाळांमध्ये विविध ठिकाणी अशा स्वरूपाचे संदेश हे दिले जातात. मात्र आता शौचालयांच्या सेल्फी संदर्भात अनेक शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका शिक्षकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार हे व्हाट्सपद्वारे पाठविण्यात आले आहे. यामध्ये कोणतेही स्पष्ट सूचना शिक्षकांना दिलेली नाही किंवा पत्रकामध्ये स्पष्ट सूचना नाहीत. त्याच्यामुळे कोणत्या पद्धतीने स्पर्धा घ्याव्या? संपर्कासाठी दिलेल्या ऑनलाइनचा नंबर दिलेला आहे, त्यावर कोणी प्रतिसाद देत नाही. शिवाय पत्रकात शिक्षकांना स्पष्ट सूचना नसल्यामुळे आणि आरोग्य विभागाचे काम असल्याने शिक्षकांवर हे काम लादले जात असल्याचा आरोप शिक्षक करत आहेत.
आज पर्यंत अशा काही गोष्टी शिक्षकांपर्यंत आल्या नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना हे धडे देऊ शकतो की कचरा टाकू नका तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन शौचालय केल्यानंतर पाण्याचा वापर करा किंवा छोट्या छोट्या गोष्टीचे सूचना शिक्षकांकडून दिल्या जातात. टॉयलेटसोबत सेल्फी काढा अशी स्पर्धा घेतली जात आहे, मात्र अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई नसल्याने शौचालय स्वच्छ ठेवायचे कोणी? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कानोज म्हणाले की, युनिसेफ च्या माध्यमातून स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने फक्त पत्रक काढले असून सर्व स्पर्धा या शाळांनी राबवायच्या आहेत. त्यामुळे स्पर्धांच्या प्रवेशिकांचा तपशील संबंधित शाळांवर मिळणार आहे. शिवाय स्पर्धा अनिवार्य नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे प्रवेशिका कोणत्या शाळेत किती किंवा कोणत्या स्पर्धांना आल्या याबाबत नीटसा तपशील नाही.
प्रवेशिकांचा सावळा गोंधळ
दरम्यान स्पर्धा तर आयोजित करण्यात आल्या. मात्र शिक्षकांना स्पष्ट सूचना नसल्याने स्पर्धा कशा घ्याव्यात याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रवेशिकांचा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे होतात की नाही? टॉयलेट विथ सेल्फी स्पर्धाच वादात सापडल्याचे या सर्व तपशीलावरून दिसून येत आहे.
आणखी वाचा :
Nashik ZP : काय अभियान, काय स्पर्धा, काय विषय...नाशिक जिल्हा परिषदेची अनोखी स्पर्धा