एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात वनविभागाच्या जमिनीची परस्पर विक्री; छगन भुजबळांची कारवाईची मागणी 

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात वनजमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेकडो एकर वनक्षेत्राची (Forest) भूमाफियांकडून परस्पर विक्री करण्यात येत आहे, ही बाब अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात वनजमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली.

एकीकडे जागतिक वन दिन (World Forest Day) साजरा करत असताना नाशिक जिल्ह्यात (Nashik District) वनजमिनीच्या भूखंडांची परस्पर विक्री केली जात आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले की, नाशिक जिल्ह्यात वनजमिनींवर भुमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. शासकीय यंत्रणेला भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वनजमिनी गिळंकृत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, सटाणा तसेच नाशिक तालुक्यात राखीव वनक्षेत्रातील जमिनींची परस्पर विक्री करण्यात आली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

छगन भुजबळ पुढे म्हणाले कि, नांदगाव (Nandgoan) तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात वनविभागाचे 1784 एकराचे क्षेत्र असून त्यातील 1174 एकर व 33 गुंठयांचे निर्विकरण झालेले आहे. ते वजा करता उर्वरित क्षेत्रात 762 एकर क्षेत्र राखीव वनासाठी ठेवण्यात आले आहे. या वनजमिनीची नोंद बदलून त्या क्षेत्राला वनेत्तर दाखविण्यात येऊन तब्बल 300 एकर वनजमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे. राखीव वनक्षेत्राच्या सातबाऱ्यावर थेट खाजगी कंपनीचे नाव लागल्याने वनविभागासह महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाचा चौकशी सुरू असतानाच बैसाने ता.सटाणा येथील 55 एकर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार झाल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. 

तर नाशिक शहरालगतच्या गंगापूर, म्हसरूळ, चेहडी बु.गावातील वनजमिनींच्या सातबाऱ्यावरील राखीव वने नोंदच गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्या पाठोपाठ शिंदे गाव आणि संसारी गाव परिसरातही झाल्याची घटना घडली आहे. ही बाब अतिशय धक्कादायक असून शासनाने भूमाफियांना आळा घालावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

अडीच लाख झाडांचे पांजरापोळ

दरम्यान नाशिक शहरात औदयोगिक वसाहत उभारण्यासाठी चुंचाळे परिसरात असलेल्या चुंचाळे परिसरात असलेल्या अडीच लाखांचे झाडांचे पांजरापोळ जंगल नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. याला स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांनी विरोध केला आहे. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत पाठपुरावा केला असून हा प्रकल्प नाशिकच्या हिताच्या असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तर दुसरीकडे पांजरापोळ परिसरात अडीच लाखांवर झाडे असून हा नाशिकचा श्वास आहे. त्यामुळे ही झाडे जर तोडली तर मुंबई पुणे शहरासारखी नाशिकची अवस्था होईल, अशी माहिती नाशिकच्या पर्यावरणप्रेमींकडून देण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget