एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात दादा भुसेंची एंट्री, सुहास कांदेचा पत्ता कट?

Maharashtra Cabinet Expansion : एकेकाळचे मनसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे खंदे समर्थक असलेले सुहास कांदे (Suhas Kande) यांचा मात्र जवळपास पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Cabinet Expansion : आज महिन्यानंतर अखेर मंत्री मंडळाचा विस्तार (Maharashtra cabinet Exapansion) होत असून नाशिक (Nashik) दोन आमदार शिंदे गटात (CM Eknath Shinde) आहेत. मात्र यापैकी दोन वेळा मंत्री पद भूषविलेले दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांची तिसऱ्यांदा मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता असली तरी एकेकाळचे मनसैनिक आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा मात्र जवळपास पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामंध्ये आमदार व ठाकरे सरकारच्या काळात मंत्री राहिलेले मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांचे नाव निश्चित झाले आहे. 

दरम्यान शिंदे गटाकडून नऊ नवे निश्चित असल्याचे समजते आहे. मात्र यात आमदार सुहास कांदे यांचे नसल्याने चर्चाना उधाण आले आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडत नवा गट स्थापन केला. यात नाशिकमधून सर्वात पहिले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटात सहभाग घेत सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. सुहास कांदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या मार्दर्शनाखाली त्यांनी नांदगावसह जिल्हाभरात शिवसेना बळकट करण्याचे काम केले. मात्र त्यानंतर शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी देखील शिंदे गटाला पाठींबा देत मनातली खदखद बाहेर काढली. 

दरम्यानच्या दिवसांत शिवसेना (Shivsena) आणि आमदार सुहास कांदे यांच्यात अनेकदा वाढी निर्माण झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिकसह मनमाडमध्ये शिवसंवाद दौरा केला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि आमदार सुहास कांदे यांच्यात चांगलेच वॉर पाहायला मिळाले. तर त्यानंतर काहीच दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष नाशिक दौरा केला. यात मालेगाव, नांदगाव त्यांनी भेटी दिल्या. या सर्व प्रकरणावरून आमदार सुहास कांदे यांची मंत्रिपदाला वर्णी लागेल या आशा पल्लवित झाल्या. 

त्यानंतर शिंदे गट आणि भाजप पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले. तब्बल दिवसांनंतर आज मंत्री मंडळाचा विस्तार होत असून यामध्ये शिंदे गट आणि भाजप मिळून अठरा मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. मात्र सध्या नावे जाहीर झालेल्या यादीमध्ये मात्र सुहास कांदे यांचे नाव नसल्याचे मंत्री पदाचा पत्ता कट झाल्याचे समोर येत आहे. मात्र अद्यापही मंत्री मंडळाबाबत निश्चित नसल्याने शिंदे गटाकडून नक्की कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget