Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Girish Mahajan on Eknath Khadse : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच विजयाचे फटाके फोडणार, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते.
नाशिक : एकीकडे दिवाळीची (Diwali 2024) धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून निवडणुकीत महाविकास आघाडीच विजयाचे फटाके फोडणार, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले. आता एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांना टोला लगावला आहे.
सध्या राज्यात महागाई आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळं जनता त्रस्त झाली आहे. जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कौल मिळेल आणि महाविकास आघाडीचे फटाके फुटतील, असे त्यांनी म्हटले. तर मागील निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा 1800 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेतला असून या निवडणुकीमध्ये असं होणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे.
गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला
एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता नंतर फटाके फोडू यामध्ये अडचणी काय, फटाके फोडायची आणि लावायची फार घाई करू नका, असा टोला त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'डॅमेज कंट्रोल’साठी गिरीश महाजन मैदानात
दरम्यान, नाशिक शहरातील नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मध्य या मतदारसंघात बंडखोरीने भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजप पक्षातील इच्छुकांनी थेट बंडाचे हत्यार उपसले आहे. भाजपचे दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. मनसेकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले यांच्यासमोर गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गणेश गीते यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाकडून गणेश गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे यांना तिकीट मिळाल्यानंतर नाराजीचा सुर दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरांची मनधरणी करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यासाठी गिरीश महाजन तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.
आणखी वाचा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट, नाव बुलेट पाटील; नवाब मलिकांविरुद्ध लढणारा महायुतीचा उमेदवार कोण?