एक्स्प्लोर

शिंदे गटाने नाशिकच्या उमेदवारांना चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले, निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश

Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना शिंदे गटाने थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघात एबी फॉर्म पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का दिला होता.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये (Nashik News) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाने (Shiv sena Shinde Group) थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली (Deolali Assembly Constituency) आणि दिंडोरी मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) एबी अर्ज पाठवून राष्ट्रवादी अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) जोरदार धक्का दिला. देवळालीत राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) आणि दिंडोरीतून धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी शिंदे गटाच्यावतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली. आता नाशिकमध्ये चार्टर्ड प्लेनने आणलेल्या एबी फॉर्म प्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) चौकशीचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिंडोरी मतदारसंघात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि देवळालीत आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचारास सुरूवात केली असतानाच अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना शिंदे गटाकडून धक्का दिला. महायुतीत (Mahayuti) जागा वाटपाच्या चर्चेत देवळाली आणि दिंडोरीच्या जागेवर शिंदे गटाने दावा केला होता. मात्र जागा वाटपात हे मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एबी फॉर्म चार्टर्ड प्लेनने नाशिकला (Nashik News) पाठवले होते.

निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश

आता निवडणूक आयोगाने याबाबत दखल घेतली आहे. जिल्हा निवडणूक शाखेला याबाबत विचारणा करण्यात आली आहे. अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते, कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता यया प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आता प्रकरणी निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे दागिने जप्त, विधानसभेच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये घबाड सापडलं

Maharashtra Assembly Election 2024 : अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांचा वेळ; अडचणी वाढल्या, काय आहे प्रकरण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget