एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचं आता 'मिशन नाशिक', गिरीश महाजनांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीच्या वाटेवर, भाजपमधून गळतीला सुरुवात

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये पक्षांची अदलाबदली सुरु असल्याचे चित्र आहे. आता नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरुवात झाल्याची दिसून येत आहे.   

राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. मात्र ज्या उमेदवारांना तिकीट मिळणार नाही अशी उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून तिकिटासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. 

गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर

त्यातच आता नाशिकमध्ये भाजपमधून गळतीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. माजी स्थायी समिती सभापती आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते (Ganesh Gite) हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत आज गणेश गीते जयंत पाटील (Jayant Patil) आणि शरद पवारांची (Sharad Pawar) घेणार भेट आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले (Rahul Dhikle) हे भाजपचे  विद्यमान आमदार आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Group) वाटेवर आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

भाजपची पहिली यादी आज होणार?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शुक्रवारी पहिली उमेदवारी यादी (BJP Candidate list) जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या यादीत 100 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 100 उमेदवारांची नावे निश्चित करताना गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी हा प्रमुख निकष होता. अनेक विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर पक्ष नाराज आहे. त्यांच्याऐवजी संबंधित मतदारसंघात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीतून नेमकी कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास वाढला 
स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास वाढला 
Buldhana Nagar Parishad : बुलढाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यात जुंपली; घराणेशाहीवर बोट, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
बुलढाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यात जुंपली; घराणेशाहीवर बोट, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
धक्कादायक! पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ 
स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास वाढला 
स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास वाढला 
Buldhana Nagar Parishad : बुलढाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यात जुंपली; घराणेशाहीवर बोट, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
बुलढाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यात जुंपली; घराणेशाहीवर बोट, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
Maharashtra Live blog: संपूर्ण राज्यात महायुतीसाठी वातावरण पोषक, 70 टक्के जागांवर विजय मिळेल: एकनाथ शिंदे
Maharashtra LIVE: संपूर्ण राज्यात महायुतीसाठी वातावरण पोषक, 70 टक्के जागांवर विजय मिळेल: एकनाथ शिंदे
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Embed widget