(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : नाशकातील कौटखेडे गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले; आजपर्यंत एकही कोरोनाबाधित नाही
कोरोनाचा दुसरी लाट आली आणि नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अनेक निर्बंध लादण्यात आले. तसेच त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात दिसून आला. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचा मतदार संघही याला अपवाद ठरला नाही. येवला तालुक्यातील 124 पैकी 123 तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र कौटखेडे हे गाव त्याला अपवाद ठरले.
नाशिक : कोरोना संसर्ग आपल्या गावात येऊ नये म्हणून अनेक गावांनी विविध उपाय योजना आखल्या आणि कोरोनाला गावच्या वेशिवरच रोखले. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील कौटखेडा या गावने अशाच काही उपाय योजना केल्या आणि गावात कोरोनाचा शिरकावच होऊ न दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुध्दा हे गाव कोरोनामुक्त असल्याचं पहावयास मिळाले.
कोरोनाचा दुसरी लाट आली आणि नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अनेक निर्बंध लादण्यात आले. तसेच त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात दिसून आला. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचा मतदार संघही याला अपवाद ठरला नाही. येवला तालुक्यातील 124 पैकी 123 तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र कौटखेडे हे गाव त्याला अपवाद ठरले. तळवाडे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या 600 लोकसंख्येच्या कौटखेडे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून विविध उपाय योजना आखण्यात आल्या. गावातून कोणाला महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असेल तरच त्याला बाहेर सोडण्यात आले. तसेच आल्यानंतर त्यांनी काय करावे हे त्यांना सांगण्यात आले. तर गावातसुध्दा विनाकारण कोणी फिरु नये, असा नियम आखण्यात आला. त्यातच बाहेर पडताना मास्कचा वापर करणं, हात स्वच्छ धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं, अशा उपाय योजनांमुळे गावात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकानेच दक्षता घेतली. विशेष म्हणजे मागील वर्षी सुध्दा या गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही आणि याहीवर्षी येवला तालुक्यात हे गाव त्याला अपवाद ठरले.
कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात सुरु होताच, या गावात तालुका आरोग्य यंत्रणेकडून प्रबोधन करण्यात आले. गावातील आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी जनजागृती करत ग्रामस्थांना कोरोनापासून वाचण्यासाठीचे महत्व पटवून दिले आणि दर आठवड्याला तपासणी सुरु केली. गावातील नागरीकांना एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयामुळे अनेक बंधने पाळण्यात आली आणि आजपर्यंत गावात एकही रुग्ण सापडला नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. एकूणच येवला तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढलेली असताना कौटखेडे या गावाने मात्र गावात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून स्वतःवर घालून घेतलेल्या बंधनामुळे या गावाने वेशीवरच कोरोनाला रोखत गाव कोरोनामुक्त ठेवले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Coronavirus : कोरोनाला वेशीवरच रोखणारं सांगलीतील बाणूरगड; दोन्ही लाटेत गावात संसर्गाला 'नो एन्ट्री'