Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनरची सात वाहनांना जोरदार धडक, 13 प्रवासी जखमी
Kasara ghat Accident : नाशिकच्या कसारा घाटात विचित्र अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे.
Nashik Accident News नाशिक : एकीकडे मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. तर दुसरीकडे कसारा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. कसारा घाटात विचित्र अपघात झाला असून एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात सुमारे 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या कसारा घाटात विचित्र अपघात झाला आहे. एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना धडक दिली असून यात सुमारे 13 ते 14 प्रवासी जखमी झाले आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातामुळे काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. विकेंडमुळे नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. त्यातच कसारा घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने कंटनेरने सहा ते सात गाड्यांना धडकला. या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी झाले आहेत. तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी कसारा घाटात दरड कोसळली होती. सुदैवाने यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरड कोसळल्याचा मेसेज हेल्पलाईनला गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Accident : नाशकात पुन्हा भीषण अपघात, आयशर-कारची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू