Jayant Patil : निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार का? जयंत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!
Jayant Patil on Nilesh Lanke : निलेश लंके हे आजचा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Jayant Patil on Nilesh Lanke : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. निलेश लंके हे आजचा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काल भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. ही यादी जाहीर होताच निलेश लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कारण निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar South Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
निलेश लंके एक चांगला चेहरा - जयंत पाटील
याबाबत जयंत पाटील म्हणाले की, निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधील नेते आहेत. ते पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहेत. ज्या आमदारांनी सह्या केल्यात त्यांना माहिती नाही कशावर सही केली, त्यापैकी निलेश लंके एक आहेत. आमचे जागावाटप अजून झाले नाही पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता निलेश लंके यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटलांचे संकेत
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सासरे एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार की भावजय रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळणार? याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता रावेरमधून रोहिणी खडसे उमेदवार असू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहे. काल रात्री जळगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. रोहिणी खडसे यांच्या नावावर चर्चा झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं, जयंत पाटील म्हणाले...
शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरणार नाही असे हमीपत्र दाखल करण्याचे आदेश अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. यावर जयंत पाटील यांना विचारले असता नक्की मला माहिती नाही की, कोर्टाने काय म्हटलंय, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा