एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशिकसह दिंडोरी तालुक्यात धो-धो पाऊस, तासाभराच्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन लागले वाहू

Nashik Rain Update : नाशिक शहरासह दिंडोरीत तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. आज नाशिक शहरासह दिंडोरीत (Dindori) तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती पाहायला मिळाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. तासाभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 

आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नाशिक शहरासह दिंडोरी तालुक्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासहा धो धो पाऊस (Nashik Rain Update) बरसला. पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.तर दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळे जवळ झाड रस्त्यावर पडून काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी झाड बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. तथापि काल मृग नक्षत्रास प्रारंभ होत असल्याने वातावरणात बदल होवून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. दिंडोरी शहरासह खतवड, आंबेदिंडोरी, तळेगाव दिंडोरी, जानोरी, जऊळके, खेडगाव, बोपेगाव, पालखेड बं., वलखेड, निळवंडी, पाडे, मडकीजांब, वनारवाडी, ननाशी या भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

'या' भागात पावसाचा येलो अलर्ट

दरम्यान, पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. 

महत्त्वाच्या बातम्या

मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Nashik Crime News: भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
भावली धरणावर छेडछाड अन् राडा, चारवेळा जीवघेणा हल्ला, इगतपुरीत पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्ला करणारा गुंड शेवटी हायवेवरच धाडकन पडला
Govindgiri Maharaj : उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान
उद्धव ठाकरेंना रामरक्षा शब्द आठवला, हि ईश्वराची कृपा; त्यांनी रामरक्षा नीट बोलून दाखवावी मग आम्ही ही...; गोविंदगिरी महाराजांच थेट आव्हान

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget