एक्स्प्लोर

Girish Mahajan: माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले; तपोवन वृक्षतोडीच्या वादावर गिरीश महाजन सगळंच बोलले; म्हणाले, आता तुम्ही सांगाल तेवढे...

Girish Mahajan: तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज नाशिकमध्ये 15 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

Girish Mahajan: आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात (Tapovan) साधुग्राम उभारण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला (Nashik Tree Cutting) पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे. पुण्यातील श्रीराम पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज नाशिकमध्ये (Nashik News) 15 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पर्यावरण प्रेमी, साधू-महंतांच्या उपस्थितीत मखमलाबाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर नाशिक शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार असून 'हरित नाशिक'च्या संकल्पनेअंतर्गत नाशिककरांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.   

वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी गिरीश महाजन म्हणाले की, आज आपल्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून वृक्षांचा विषय हा चर्चेचा विषय होता. आता आपण वृक्षारोप अ‍ॅप तयार केले आहे. मागील कुंभमेळा काळात जशी व्यवस्था होती, तशीच व्यवस्था केली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. मागील काही दिवसात तिथे झाडे, झुडुपे वाढलेली आहेत, ती तोडण्याचा विषय होता. मात्र, माझे कार्टून बनविण्यात आले. मला लाकूड तोड्या म्हटले गेले. पर्यावरण प्रेमी, काही राजकीय संघटना यात उतरल्या. पण, मला त्याबाबत बोलायचे नाही. 

Girish Mahajan: 15 हजार काय 25 हजार झाडे लावू

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, साधू गांजा पितात, असे जे बोलतात ते बोलणे योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीनंतर मी झाडे बघण्यासाठी गेलो. ही सर्वांची जबाबदारी आहे. एक झाड आईच्या नावावर लावा, असे आवाहन मोदींनी केले होते. अजूनही कुठे जागा असेल तर तिथं ही झाडे लावू. 15 हजार काय 25 हजार झाडे लावू. मी आमदार, नगरसेवकांना सांगितले की, तुम्ही जागा सांगा आपण झाडे लावू. ही झाडे सीएसआर फंडमधून लावली जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Girish Mahajan: आता तुम्ही सांगाल तेवढे झाडे लावणार

आमच्यावर आरोप करू नका. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असे आरोप केले, असे पाप कोण करणार? असे म्हणत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मागील कुंभमेळ्यामध्येही तुम्ही माझे काम बघितले आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.  विविध संस्था, संघटना वृक्षारोपणात सहभागी झाल्या आहेत. आता तुम्ही सांगाल तेवढे झाडे लावणार आहोत. तुम्ही नाशिककर म्हणाल की, आता बस झाले. पण आम्ही थांबणार नाही, असे देखील गिरीश महाजन म्हणाले. 

आणखी वाचा 

Bhandara : मंत्री गिरीश महाजन पुन्हा ठरले संकटमोचक; खासदार पडोळेंसोबत थेट मोबाईलवर चर्चा; कुडकुडत्या थंडीत सुरू असलेलं जलसमाधी आंदोलन तब्बल 6 तासांनी मागे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Embed widget