एक्स्प्लोर

Dada Bhuse : 'सुप्रिया सुळेंचा बालिशपणा, महाराष्ट्राच्या करोडो बहि‍णींची थट्टा'; दादा भुसेंचं जोरदार प्रत्युत्तर

Dada Bhuse Reply to Supriya Sule : मी माझ्या बहि‍णींना विनंती करते की, तुम्ही पटकन बँक खात्यातून पैसे काढून घ्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत येणारे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मी माझ्या बहि‍णींना विनंती करते की, तुम्ही पटकन ते पैसे काढून घ्या. भाजपाचे दोन दोन लोक म्हणत आहेत की पैसे काढून घेऊ. त्यामुळे ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले आहेत त्या भगिंनींनी पैसे काढून घ्या, असे त्यांनी म्हटले. आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दादा भुसे म्हणाले की, 19 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आहे. याच शुभदिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचे बहिणींना पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीपावलीची अ‍ॅडव्हान्स  भेट महिलांना देण्यात आलीय.  जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया होत आहे, असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दादा भुसे म्हणाले की, हा बालिशपणा आहे. महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची त्या थट्टा करत आहेत. सन्मान निधी जाणार आहे याचं काही लोकांना दुःख होत आहे. आज राजकीय बोलायचे नाही. आजचा दिवस चांगला आहे. पण काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते सैरभैर झालेत. त्यामुळे योजनेत खोडे घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रयुत्तर त्यांनी सुप्रिया सुळेंना दिले. 

लोकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने काम सुरू

नाशिक मुंबई महामार्गाच्या परिस्थितीवर दादा भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यांनी देखील महामार्गाची पाहणी केली. बऱ्यापैकी कामे झालेली आहे. रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवले जातायत. काही प्रमाणात वाहतूक देखील सुरळीत झाली आहे. कामाची जलद गतीने प्रगती सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने काम सुरू असून त्याचा रिझल्ट दिसून येतोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Supriya Sule : तू 1500 रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते, सुप्रिया सुळेंचा रवी राणांना इशारा Video

Advay Hire is out of jail : विधानसभेच्या तोंडावर नाशकात ठाकरे गटाला मोठा दिलासा; मंत्री दादा भूसेंविरोधात भिडू ठरला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छाTop 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget