National Youth Festival : युवा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रॅण्डिंगची मोठी संधी; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Eknath Shinde in Nashik : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घेतला.
National Youth Festival नाशिक : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारीला तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या मैदानाची त्यांनी पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिकमध्ये 12 जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाची संधी महाराष्ट्राला मिळाली. यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो.
येथे होणार विविध कार्यक्रम
आज मी आढावा बैठक घेतली. २० समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. देशभरातून 8 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. तपोवन येथे उद्घाटन होईल, हनुमाननगरच्या मैदानात इव्हेंट होतील. कालिदास कलामंदिरात स्पर्धा होतील. तसेच महात्मा फुले सभागृहात फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील. रावसाहेब थोरात सभागृहात गायन स्पर्धा, उदोजी महाराज सभागृहात देखील विविध कार्यक्रम होणार आहेत, असे ते म्हणाले.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकला मोठं व्यासपीठ
नाशिकचे स्थानिक खेळाडू, कलाकार यांचा या महोत्सवासाठी सहभाग असणार आहे.युवा महोत्सवाच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ नाशिकला मिळणार आहे. युवा महोत्सव म्हणजे नाशिकला ब्रॅण्डिंगची मोठी संधी असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
खेळाडूंची व्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज
युवक-युवतींच्या निवासासह भोजनाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. खेळाडूंची संपूर्ण व्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक राज्यातील खेळाडूची कुठलीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान मोदींचे होणार जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच जंगी स्वागत नाशिककर करतील. शहर सजवण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आढावा बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांचा टाहो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच अंगणवाडी सेविकांना टाहो फोडला. मात्र पोलिसांनी (Nashik Police) अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे काही महिला सुरक्षेच कड तोडून मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्या. यावेळी पोलिसांना महिलांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्या महिलांना सोडून देण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या