एक्स्प्लोर

रोहित पवार म्हणाले, फडणवीसांच्या स्क्रिप्टनुसार भुजबळ बोलतात, आता छगन भुजबळांकडून थेट शरद पवार, अजित पवारांचं नाव घेऊन उत्तर

राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

नाशिक:  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोपी रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केला आहे. या आरोपावर छगन भुजबळांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.  मला कुणी स्क्रिप्ट देत नाही. मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही, ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली, असे भुजबळ म्हणाले.  ओबीसीचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असे भुजबळ म्हणाले. 

छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही मंत्री म्हणाले, भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही. माझी काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर येऊ नका स्वतंत्र बैठक घ्या. ओबीसी आरक्षणचा बचाव करणे ही तुमची आणि माझी भूमिका एकच आहे. त्यामुळे तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात काही नेते माझ्या सोबत येतील काही जातील हे चालूच राहणार आहे. काही लोकांच्या अडचणी असू शकतात, मला त्याबद्दल काही रोष नाही. या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले आहे. कुठेही जा पण ओबीसीसाठी लढा,  माझ्या विरोधात बोलले तरी चालले,पण ओबीसीच्या बाजूने बोला.

नाशिकच्या सभेसाठी जरांगेंना शुभेच्छा: भुजबळ

मनोज जरांगेच्या नाशिकमध्ये होणाऱ्या सभेवर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले,  कोणालाही कुठेही सभा घेण्याचे अधिकार आहे. मनोज जरांगेना सभेसाठी शुभेच्छा असून त्यांचे नाशिकमध्ये स्वागत आहे.  मी इतरांप्रमाणे कोणालाही गावबंदी  करत नाही. प्रत्येकाने आपले मत मांडवी, लोकांना जे पटेल त्यांच्या बाजूने लोक जातील.

निवडणूक आयोग योग्य निर्णय देईल : भुजबळ

निवडणुकीत आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत सुनावणी पार पडली. त्याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले,  निवडणूक आयोग  एक प्रकारचे कोर्ट आहे. दोन्ही बाजूचे वकील एकमेकांवर आरोप करत आहेत. आरोप प्रत्यारोप सुरू असतात. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेतील. अनेक लोक आहेत ज्यांनी सही केली ते तिकडे गेले लाखो लोकांत दोनचार लोक इकडे तिकडे गेल्यानं फार काही फरक पडेल असे वाटत नाही.

आपल्या राज्यातील व्यापार इतरत्र जाऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्र मुबंईमध्ये काय कमी पडले याचा विचार करावा. सरकार आपल्या मागे  उभे आहे. 1960 पासून वेगवेगळे उद्योग राज्यात येत आहेत,महाराष्ट्राने त्याचे स्वागत केले आहे. 

हे ही वाचा :

भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणीRadhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget