पंकजची गाडी अडवली, भुजबळ कुटुंब दिसले तर मारा म्हणतात, छगन भुजबळांचा मनोज जरांंगेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal : भुजबळ कुटुंबीय आले तर मारा असे म्हणतात. मात्र भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे, घाबरणार नाही, असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांना अडवले ते लोक कोण होते, काय होते हे बघितले पाहिजे, माराठा समाजाचे लोक होते का? हे पोलिसांनी बघावे. भुजबळ कुटुंबीय आले तर मारा असे म्हणतात. मात्र भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे, घाबरणार नाही, असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.
शुक्रवारी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोध केला. त्यामुळे पंकज भुजबळांना आपला दौऱ्यावर अर्ध्यावर सोडून परतावे लागले होते. यावरून आज शनिवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
आरक्षण दिल्यानंतर आंदोलन का?
छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनचा इशारा दिलाय तर काल पंकज भुजबळ याचा ताफा अडविण्याचे कारण नाही. तीन मुख्यमंत्री काळात मी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठींबा दिला. आता आरक्षण दिल्यानंतर आंदोलन करण्याचे कारण वाटत नाही. निवडणूक प्रचारासाठी लोक गावात जातील, त्यांना अडवणे लोकशाहीला धरून नाही. आरक्षण दिल्यानंतर आंदोलन का? आम्ही विरोध केला असता तर आंदोलन केले तर ठीक होते.
जरांगे यांना राजकीय पाठींबा
पंकज भुजबळ यांना अडवले ते कोण लोक होते, काय होते हे बघितले पाहिजे, मराठा समाजाचे लोक होते का हे पोलिसांनी बघावे. मराठा समाजासाठी काही स्थानिक राजकारणाचा काही सबंध आहे का हे बघावे. काही व्हिडिओ बघितले. भुजबळ कुटुंबियांचे आले तर मारा म्हणतात. भुजबळ फॅमिली घाबरत नाही, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम केले आहे, घाबरणार नाही. जरांगे यांना राजकीय पाठींबा आहे. सत्य लपून राहत नाही, जरांगेंना कोण चुकीचा सल्ला देत आहे हे बाहेर येईल. लग्नाचे मुहूर्त पुढे ढकला. निवडणूकही पुढे ढकला असे ते सांगतात, आता काय बोलावे, त्यांना जे नेता मानतात आशा सर्व लोकांना नमस्कार, असे म्हणत छगन भुजबळांनी हसत हसत जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना हात जोडले.
मनोहर जोशी, राजेंद्र पाटणी यांनी भुजबळांनी वाहिली श्रद्धांजली
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. दुःखद बातमी कळली. शिवसेना स्थापनेपासून मी शिवसेना सोडेपर्यंत बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. संकटांना तोंड दिले. राजकारण आणि उद्योग दोन्ही उत्तमपणे मनोहर जोशी यांनी हाताळले. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, हॉटेल त्यांनी सांभाळले. अनेक दिवसांपासून ते आजरी होते. बाळासाहेब, नवलकर, सुधीर जोशी गेले, त्या पाठोपाठ शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते असणारे मनोहर जोशी गेले. त्यावेळच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. शिवसेना आणि उद्योग दोन्ही वेगवेगळ्या कामगिरी त्यांनी केल्या होत्या. कारंजाचे भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचेही निधन झाले. ही सुद्धा धक्कादायक बातमी आहे. अतिशय सोजवळ व्यक्ती होती, अनेकवेळा निवडून आली होती. त्यांनी चांगली कामगिरी केली होती.
ग्रामीण भागात शरद पवार म्हणजे घड्याळ
शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार गटाला थोडाफार परिणाम जाणवेल, नवीन चिन्ह बिंबवावे लागते. स्मार्ट फोन सोशल मीडियामुळे फार अडचण होणार नाही. ग्रामीण भागात शरद पवार म्हणजे घड्याळ हे लोकांना माहिती आहे.
आणखी वाचा