Sushma Andhare : सुषमा अंधारेंना 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मालेगावात गुन्हा दाखल
Malegaon News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून अमन परदेशी यांनी तक्रार दाखल केली.
Sushma Andhare मालेगाव : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर मालेगाव (Malegaon) तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून अमन परदेशी (Aman Pardeshi) यांनी मालेगाव पोलिसात (Police) याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात भादवि कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता. या शब्दप्रयोगांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मालेगाव येथील अमन परदेशी यांनी केला. त्यामुळे परदेशी यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात (Malegaon Police Station) तक्रार दाखल केली आहे. परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Case Registered) केला आहे.
याआधीही झाला होता अंधारे-परदेशी वाद
काही दिवसांपूर्वी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात भाषण करताना सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्यासोबत नाशिकच्या अमन परदेशी यांचे नाव घेतले होते. तेव्हा आपण अंधारे यांच्याविरोधात मानहानीचा दावा परदेशी यांनी याआधी केला होता.
ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
मालेगाव (Malegaon) येथील नेते शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay hiray) हे सध्या जेलमध्ये आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गिरणा कारखान्याशी संबंधित १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला होता. या विरोधात दादा भुसे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मानहानीचा दावा केला होता. आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावरही मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
ऐन हिवाळ्यात नाशिकचे राजकीय वातावरण तापले, नवनवर्षाचा पहिला महिना ठरणार पॉलिटिकल ब्लॉकबस्टर