एक्स्प्लोर
Advertisement
PFI च्या कार्यकर्त्यांकडून 'अशांतता', नाशिकच्या पाच संशयितांना 11 दिवसांची पोलीस कोठडी
Nashik : मालेगाव येथून अटक केलेल्या व बीड, पुणे, कोल्हापूर येथून नाशिकमध्ये आणलेल्या संशयितांना न्यायालयात हजार केले असना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली
ATS Raid Nashik : आज पहाटेपासून राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरातील महत्वाच्या शहरात धाडी टाकून पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. मालेगाव येथून अटक केलेल्या व बीड, पुणे, कोल्हापूर येथून नाशिकमध्ये आणलेल्या संशयितांना न्यायालयात हजार केले असना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था तसेच एटीएसच्या माध्यमातून आज पहाटेपासून पॉप्युलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह (Aurangabad) इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव येथून देखील एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास बीड, पुणे, कोल्हापूर येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांना नाशिक येथील एटीएस (ATS) कार्यालयात आणण्यात आले होते.
त्यानंतर संशयितांना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अटक करण्यात आलेल्या PFI च्या पाच सदस्यांना 03 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. PFI संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसे पुरविले, समाजात अशांतता पसरले असे कृत्य, कट रचणे आदी गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिकच्या जिल्हाध्यक्षाला अटक
दरम्यान पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईत नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगाव गाठत मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यास नाशिकच्या एटीएस कार्यालयात हजर करण्यात आले. याच बरोबर राज्यभरातून कोल्हापूर, बीड, उणे आदी शहरात ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले. सायंकाळी साडे सहा वाजता न्यायालयात हजर केले. त्यावेळी पाच संशयितांना 03 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सैफुर रहेमान हा नाशिक जिल्हाध्यक्ष
आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने मालेगाव येथे कारवाई केली. या कारवाईत सैफुर रहेमान यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement