Nashik Trimbakeshwer : 'हे सगळं भीती वाटण्यासारखच, कशाला हवीय परंपरा', उरूस आयोजक सलीम सय्यद झाले भावूक
Nashik Trimbakeshwer : 'आमच्या आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. मात्र असं होईल असं वाटलं नव्हतं'. त्यामुळे आता कुठेतरी थांबाव असं वाटतंय.
Nashik Trimbakeshwer : 'आमच्या आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे आम्ही देखील ही परंपरा जपत आलेलो आहे, मात्र असं होईल असं वाटलं नव्हतं'. त्यामुळे आत्ता कुठेतरी हे थांबाव असं वाटतंय, आमच्याकडून जर काही चुकी झाली असल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफ करावं, अशा शब्दांत उरूसचे आयोजक सलीम सय्यद यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पुढच्या वर्षापासून त्र्यंबक (Trimbakeshwer) मंदिराला धूप दाखवणार नाही, अन्यथा उरुसाची प्रथाच बंद करू असा निर्णय सलीम सय्यद यांनी घेतला आहे.
त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwer Mandir) घटनेत प्रकरणी आज नागरिकांच्या माध्यमातून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामसभेमध्ये हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान 13 तारखेला झालेल्या घटनेनंतर आज हिंदू महासंघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwer City) प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात आलं. यावेळी गोमूत्र शिंपडून हिंदू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर उरूस आयोजकांपैकी चार जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उरूस आयोजक सलीम सय्यद यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षापासून त्र्यंबक राजाला धूप दाखवणार नाही, अन्यथा उरुसाची प्रथाच बंद करू असा निर्णय सलीम सय्यद यांनी घेतला आहे.
यावेळी सलीम सय्यद (Salim Sayyad) म्हणाले की, आमचं काहीही म्हणणं नाही, आमच्याकडून जर काही चुकी झाली असल्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफ करावं, यानंतर आम्ही धूप दाखविणार नाही, हवं तर प्रथा बंद करून टाकू, अशा शब्दांत सय्यद यांनी दिलगिरी व्यक्त केली. आमच्या आजोबांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे आम्ही देखील ही परंपरा जपत आलेलो आहे, मात्र असं होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आत्ता कुठेतरी हे थांबाव असं वाटतंय, सगळे आपले भाऊबंद आहेत, मात्र अशा प्रकारे वातावरण चिघळत असल्यास कशाला हवीय परंपरा, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्या समाजात लहानचा मोठा झालो, त्यामुळे वाद विवाद नकोत. जशी मिरवणूक निघत होती, तशीच काढू मात्र त्र्यंबक राजाला धूप दाखविणार नाही, असे मत सय्यद यांनी व्यक्त केले.
पुढील वर्षी उरूस काढू, पण...
ते पुढे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर (Nashik) शहरातील अनेक नागरिक, नेते, ज्येष्ठ नागरिक, आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे आहे. एकमेकांच्या घरी उठ बस असते. जेवण वगैरे केले जाते, मात्र असं कधीही कुठे वाटलं नाही. उरूस काढला जातो. चौकातून मिरवणूक जाते, चौकातून जात असताना त्र्यंबकराजाला धूप दाखवण्यात दाखवली जाते, मात्र यावेळी वेगळच घडलं, त्यामुळे नको आता, हे सगळं भीती वाटण्यासारखेच आहे. त्यामुळे पुढील वर्षी साध्या पद्धतीने उरूस काढू, अन्यथा बंद करू, ज्या मार्गाने जाते, त्या ठिकाणाहून जाऊ, मंदिराला धूप दाखविणार नाही, असेही सलीम सय्यद म्हणाले.