एक्स्प्लोर

Godavari Express Ganesha : 'गोदावरीचा राजा'! मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये लाडक्या बाप्पाची स्वारी, तब्बल 27 वर्षांची परंपरा 

Nashik Ganesh Chaturthi : गेल्या 27 वर्षापासून यंदाही परंपरेनुसार मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नाशिक : आज घरोघरी बाप्पाचे (Ganesh Chaturthi 2023)  आगमन होत असून आज सकाळपासून सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाचे (Ganpati Bappa Morya) आगमन होत आहे. राज्यात गणरायाचे उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमच्या (Godawari Express) धावत्या रेल्वे बोगीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या 27 वर्षांपासून प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल (Mumbai CST) एक्सप्रेसमधील पासधारक बोगीमध्ये बाप्पाची  प्रतिष्ठापना करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. 

राज्यभरात गणरायाचे (Ganesh Chaturthi)  मोठ्या उत्साहात आगमन होत असून सकाळपासून आनंददायी वातावरण आहे. सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. तर अनेक रेल्वेमध्येही बाप्पाची मनोभावे प्रतिष्ठापना करण्यात येते. मनमाड - कुर्ला गोदावरी (Manmad Kurla) एक्स्प्रेसमध्येही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून आज सकाळी वाजत गाजत मोठ्या जल्लोषात  स्पेशल एक्सप्रेसमधील पासधारक बोगीमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. आज सकाळी आमदार सुहास कांदे (Suhas Kande)  यांचे हस्ते बाप्पाचे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी असंख्य प्रवाशांसह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 'आला रे आला गणपती आला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करण्यात आला.

राज्यात गणरायाचे उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या (Nashik) मनमाडमध्ये मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसच्या धावत्या रेल्वे बोगीत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षांपासून प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. आज गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज विधिवत पूजा करून विघ्नहर्ताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवासी आणि पासधारक यांनी रेल्वेच्या बोगीत रेल्वे सुरक्षेबाबत संदेश देणारे पोस्टर चिकटवत आकर्षक अशी सजावट केलेली होती. आमदार सुहास कांदे यांनी चाकरमान्यांसह बँडच्या तालावर फेर धरत ठेका धरला. राज्यावरील दुष्काळ दूर व्हावा, असे साकडे आमदार कांदे यांनी गणरायांना घातले.

पाऊस पडू दे, दुष्काळ दूर होऊ दे..... 

गणरायाचं आगमन झाले असून आज मोठ्या भक्ती भावाने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये गणराया विराजमान झाले आहे. 'माझं गणरायाला एकच मागणं आहे. रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या घरात आनंद येऊ दे, रेल्वेला येणार विघ्न दूर कर, असं साकडे यावेळी सुहास कांदे यांनी घातले. नांदगाव मनमाड मतदारसंघात पाऊस पडू दे, दुष्काळ दूर होऊ दे, गोदावरी एक्सप्रेसमधील प्रवाशांना अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री यांना देखील विनंती करून अडचणी दूर करण्यात येईल, असा विश्वास यावेळी कांदे यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Godavari Express Ganesha : 26 वर्षांपासून बाप्पाचा मनमाड-कुर्ला प्रवास, यंदाही थाटात गोदावरी एक्सप्रेसमध्ये विराजमान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Success Story : खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025Special Report on Santosh Deshmukh : अुनत्तरीत प्रश्नांचे 2 महिने; फरार आरोपी आंधळे आहे तरी कुठे?Special Report On Rajan Salvi : उद्धव ठाकरेंचे निष्ठावान, हाती घेणार धनुष्यबाण? मात्र सामंत ब्रदर्सचा विरोध?Special Report On Ganpati Visarjan Issue : माघी गणेशोत्सव मंडळांसमोर नियमांचं विघ्न, विसर्जन रखडलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
19 चेंडूंत 90 धावा, कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Indian Migrants In America : मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत अवैध घुसखोरी करणाऱ्यांमध्ये गुजराती एक नंबरवर; हद्दपार करण्यात डोनाल्ड ट्रम्प ठरले सर्वाधिक 'कर्दनकाळ'
Success Story : खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
खडकाळ माळरानावर युवकानं फुलवलं नंदनवन, स्ट्रॉबेरीतून वर्षाला मिळतोय 36 लाखांचा नफा 
Rohit Sharma Century : BCCI साठी गुडन्यूज! हिटमॅन इज बॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी षटकार मारून रोहित शर्माने ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
BCCI साठी गुडन्यूज! हिटमॅन इज बॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी षटकार मारून रोहित शर्माने ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; तब्बल 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
'....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
Embed widget