Satyajeet Tambe : 'मी काँग्रेसचा उमेदवार, हे माझं पहिलं वाक्य होतं, पण आमच्याविरुद्ध षडयंत्र रचलं'; सत्यजित तांबेंची पत्रकार परिषद जशीच्या तशी
Nashik Satyajeet Tambe : तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून ढकलण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
Nashik Satyajeet Tambe : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं की, मी काँग्रेसचा उमेदवार आहे, हे माझं पहिलं वाक्य होतं. माझ्या वडिलांनी तर महाविकास आघाडी शब्द देखील वापरला होता, की आम्ही महाविकास आघाडीचे आहोत, मात्र तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून ढकलण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) झालेल्या आरोपानंतर आज सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने काँग्रेसकडून एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले, मात्र हे एबी फॉर्मचा चुकीचे असल्याचे समजले. त्यामुळे शेवटी अपक्ष फॉर्म भरावा लागला. महत्वाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस नावांनीच फॉर्म भरला होता, परंतु एबी फॉर्म सोडून न शकल्यामुळे तो खूप अर्ज अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. तिथून बाहेर आल्यानंतर पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे, हे माझं पहिलं वाक्य होत, असं स्पष्टीकरण यावेळी तांबेंनी दिले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली असताना सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावरून काँग्रेसने त्यांना निलंबित केलं. हे सगळं असताना सत्यजित तांबे यांनी या सगळ्यामागील नेमकं कारण आज स्पष्ट केले आहे. त्यानुसार ते म्हणाले कि, टाय दिवशी आम्हाला जे एबी फॉर्म दिले होते ते चुकीचे होते. एक नागपूर व दुसरा औरंगाबाद साठी होता, नाशिकच्या निवडणुकीचा एबी फॉर्म नव्हताच. तरीदेखील आम्हाला खोटं ठरविण्यात आले. शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. त्यात देखील काँग्रेस पक्षाचा उल्लेख केला होता. मात्र तांबे कुटुंबियांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी युवक उमेदवाराला संधी न देण्यासाठी, थोरातांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळी स्टोरी रचल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे.
सगळी स्क्रिप्टेड स्टोरी...
एकीकडे उमेदवारी करण्याचा निर्णय तांबे परिवाराला देण्यात आला. दुसरीकडे वडिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. जर माझे वडील सांगताहेत की मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला करायचं आहे. तर माझ्या वडिलांची उमेदवारी साडेबारा वाजता का जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातल्या एकही विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावतीतून जे निवडून आले, त्यांचे नाव दिल्लीतून आलं का? नागपूर शिक्षक मतदार संघातून जे निवडून आले त्यांचे नाव दिल्लीतून जाहीर झालं का? मग आम्हालाच उमेदवारी का बर दिल्लीतून दिली. हा पूर्णपणे एका षडयंत्राचा भाग आहे. ही स्क्रिप्टेड स्टोरी होती. ती स्टोरी बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला कुठेतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्यासाठी होती.
भविष्यामध्ये अपक्षच राहील...
सत्यजित तांबे यावेळी म्हणाले, कि निवडणुकीच्या काळात अनेक शिक्षक संघटना आम्हाला पाठींबा दिला आहे. टीडीएफ व शिक्षक भारतीसह अनेक संघटनांनी पाठीशी उभे राहून आम्हाला मदत केली. त्यामुळे या पुढील काळात देखील मी अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. या सगळ्या संघटनांनी मदत केल्याने निवणूक जिंकलो आहे, मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र आमदार म्हणून भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका आहे. लोकहिताचे काम करण्यासाठी वेळोवेळी जे जे सरकार असेल, त्या सरकारकडून मदत घेईल, विरोधी पक्ष नेत्यांकडे जाईल, सगळ्यांकडे जाईल, मार्गदर्शन घेईल असे प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.