(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Accident : वणी-सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात, कार-क्रुझर अपघातात चार जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावरील खोरीफाट्याजवळ कार-क्रुझरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Vani-Saputara Accident : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील अपघात होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. काही दिवसांपूर्वी शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच आता वणी सापुतारा मार्गावरील खोरीफाट्यावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले आहे. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक मार्गांवर अपघाताचे (Bus Accident) प्रमाण वाढलं आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाणा (Buldhana) परिसरातील समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात (Bus Fire Accident) झाला असून यात 25 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी-सापुतारा महामार्गावर (Vani Saputara Highway) खोरीफाट्याजवळ मारुती सियाज व क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने मारुती सियाज कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले.
दरम्यान या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर, योगेश दिलीप वाघ, जतिन अनिल फावडे, रविंद्र मोतीचंद चव्हाण यांचा समावेश आहे. सियाझ कार ही सापुताऱ्याकडून वणीकडे येत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर गाडीशी तिची समोरासमोर टक्कर झाली. अपघातावेळी गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला होता. या अपघातात कमळी युवराज गांगोडे, कल्पना सुभाष सोळसे, तुळशीराम गोविंदा भोये, ललीता युवराज कडाळे, रोहिदास पांडुरंग कडाळे, योगेश मधुकर सोळसे, सुभाष काशिनाथ सोळसे, देवेंद्र सुभाष सोळसे, नेहल सुभाष सोळसे हे प्रवाशी जखमी झाले आहेत. या सर्वांना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिक नागरिकांकडून मदत
दरम्यान अपघात झाल्यानंतर आवाजाने आजुबाजुंच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यात आले, मात्र विनायक क्षिरसागर हा कारमध्येच अडकून राहीला होता. अपघाताची माहिती कळताच वणी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील 10 जण गंभीर जखमीना नाशिक येथे हलविण्यात आले आले. यात जतिन अनिल फावडे याला उपचारा साठी नाशिक पाठवले होते. जिल्हा रूग्णालयातील डाॅक्टरांनी मृत घोषित केले. रविंद्र मोतीचंद चव्हाण याची परिस्थीती चिंताजनक होती, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.