एक्स्प्लोर

Jayakwadi Dam : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएमसी पाणी रवाना, पाणीचिंता मिटणार

Nashik Rain Update : मुसळधार पावसामुळे नाशिकमधील सुमारे आठ धरणांमधून विसर्ग सुरु होता. जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएसी पाणी रवाना झाले आहे. यामुळे मराठवाड्याची तहान भागणार आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील धरणे साधारणतः तीन आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांतील मुसळधार पावसाने (Heavy rain) जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 37 हजार 585 दशलक्ष घनफूट म्हणजेच 57 टक्के जलसाठा झाला झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) देखील तुडूंब होण्याच्या मार्गावर आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील सुमारे आठ धरणांमधून विसर्ग सुरु होता. यामुळे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला (Jayakwadi Dam) आतापर्यंत 10 टीएसी पाणी रवाना झाले असल्याने मराठवाड्याची (Marathwada) तहान भागणार आहे. 

जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. आठ धरणांमधून विसर्ग वाढल्याने गोदावरीसह अनेक नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने यंदा प्रथमच गोदावरीचे पाणी पात्राबाहेर गेले होते. गोदावरीच्या पाणी पातळीतील वाढीचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले होते. मात्र आता पावसाने उघडीप घेतली असून पूर ओसरला आहे. 

जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएमसी पाणी रवाना

नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांमधून जायकवाडीसाठी जवळपास 10 हजार 464 म्हणजेच साडेदहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. मुसळधार पावसाने मागील 24 तासात जायकवाडीला चार हजार तीन दशलक्ष घनफूट म्हणजे चार टीएमसीचा विसर्ग झाला आहे. एक जून ते रविवारी सकाळपर्यंत जायकवाडीला सहा हजार 464 दशलक्ष घनफूट म्हणजे 6.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. सोमवारी सकाळी हंगामातील आतापर्यंतची आकडेवारी 10 हजार 464 दशक्ष घनफूट म्हणजे साडेदहा टीएमसीवर पोहोचल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात म्हटले आहे. सोमवारी नांदूरमध्यमेश्वरमधून 54 हजार 233 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे मंगळवारीही जायकवाडीसाठी चांगला विसर्ग होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील कोणत्या धरणात किती पाणीसाठा?  

गंगापूर – 85.86 टक्के, कश्यपी – 51.03 टक्के, गौतमी गोदावरी 87.26 टक्के, आळंदी 74.63 टक्के, पालखेड – 63.86 टक्के, करंजवण – 55.93 टक्के, वाघाड 72.81 टक्के, ओझरखेड 33.10 टक्के, पुणेगाव 76.08 टक्के, तिसगाव 6.37 टक्के, दारणा – 84.26 टक्के, भावली - 100 टक्के, मुकणे - 52.84 टक्के, वालदेवी - 100 टक्के, कडवा 81.58 टक्के, नांदुरमध्यमेश्वर- 00 टक्के, भोजापूर - 96.68 टक्के, चणकापूर - 74.82 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, नागासाक्या 00 टक्के, गिरणा 26.01 टक्के, पुनद 50.08 टक्के, माणिकपुंज 00 टक्के.

आणखी वाचा 

Nashik Rain : दोन दिवसांच्या दमदार हजेरीनंतर नाशकात पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget