Leopard Attack in Nashik : बिंबट्याची दहशत! 3 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू; अक्षरशः फरफटत नेलं; नाशिकच्या देवळाली आर्टिलरीतील घटना
Leopard Attack in Nashik : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी जवळील वडनेर परिसरातून एका अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Nashik News : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी जवळील वडनेर परिसरातून एका अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) 3 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वडनेर-पिंपळगाव रोड रेंजरोड या भागात काल (8 ऑगस्ट) आठ साडेआठ वाजेच्या सुमारे शेतीवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातील आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केलाय. दरम्यान, अंगणात खेळात असताना केलेल्या या हल्ल्यानंतर त्याला दूरवर दाट झाडी असणाऱ्या भागात देखील फरपटत नेलंय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बिबट्याने आयुषला फरफटत नेल्यानंतर तो अचानक दिसेनासा झाला. परिणामी नागरिक आयुषचा सर्वत्र शोध घेत होते. कालांतराने वन विभाग, पोलीस दल देखील घटनास्थळी दाखल झाले. अखेर साडेतीन चार तासांनी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिंबट्याची दहशत आहे. तसेच बिंबट्याला जेरबंद करण्याची मागणी हि नागरिक करत आहेत. परंतु वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. असा स्थानिकांचा आरोप आहे.
तारुखेडलेमध्ये तीन बिबट्याचा मुक्तसंचार
नुकताच निफाडच्या तारुखेडलेमध्ये तीन बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचे वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. तर स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॉमऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैदहि केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
मोर्शीच्या एसडीओच्या घरात काहीच न सापडल्याने चोरली रिव्हाल्व्हर
अमरावतीच्या मोर्शी शहरात उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या शासकीय बंगल्याच्या टीन शेडमध्ये उभी केलेल्या खाजगी कारची काच फोडून त्यात ठेवलेली रिव्हाल्व्हर चोरट्यांनी चोरून नेली. अज्ञात चोराने कारमध्ये ठेवलेल्या चाव्या उचलल्या आणि शासकीय बंगल्याची गेट उघडून आत प्रवेश केला. पण तिथून काही चोरीला गेले नाही. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार हे शासकीय कामानिमित्त वरुड येथे गेले होते. मात्र इकडे त्यांच्या शासकीय मोर्शी येथील बंगल्यावर चोरीची घटना झाली. आता शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यात देखील चोराने चोरीची हिंमत केल्याने नागरिक सुरक्षित आहेत का? हा सवाल देखील प्रामुख्याने उपस्थित होतो. तूर्तास मोर्शी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी एसडीओच्या शासकीय बंगल्याकडे धाव घेऊन पंचनामा सुरू केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास चालू केला आहे.
हेदेखील वाचा























