(Source: Poll of Polls)
एक, दोन नाही तर तब्बल 18 प्रकारचे डान्स करणारा घोडा, सारंगखेडातील 'सूर्या' ठरलाय यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू
एखाद्या पांरगत नृत्याकाराला लाजवेल असा नृत्य करणारा सुर्या एक दोन नव्हे तर तब्बल अठरा प्रकारची नृत्य करत असल्याचे त्याच्या मालकाचा दावा आहे.
नंदुरबार : सारंगखेडा (SarangKheda) घोडे बाजारात विविध कर्तब दाखवणारे घोडे नेहमीच अश्व शौकीनांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात. यंदा तब्बल 18कारच्या डान्स स्टेप करणाऱ्या सूर्या घोड्याची सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये जोरदार चर्चा आहे. एखाद्या नृत्यांगनेप्रमाणे वेगवेगळ्या लय आणि तालात नृत्य करणारा सूर्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो आहे. चेतक फेस्टिवलमध्ये (Chetak Festival) होणाऱ्या नृत्य स्पर्धेसाठी सूर्या दाखल झाला आहे. त्याचा नृत्याविष्कार पाहण्यासाठी अश्वप्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे.
एक दोन नव्हे तर तब्बल 18 प्रकारचे नृत्य प्रकार अवगत असलेला सुर्या आपल्या लिलया नृत्याने साऱयांनाच आकर्षित करत आहे. पंजाबी जातीचा पंधरा वर्षीय पांढरा शुभ्र आणि रुबाबदार दिसणारा सुर्या आपल्या नृत्याविष्काराने सर्वांनाच अचंबीत करत आहे. मध्यप्रदेशच्या बडवाणीच्या सुर्यास्टड फार्मच्या बंटीभाईचा हा घोडा सारंगखेडा घोडे बाजारात सध्या लहान मोठ्या सर्वच अश्व शौकींनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. एखाद्या पांरगत नृत्याकाराला लाजवेल असा नृत्य करणारा सुर्या एक दोन नव्हे तर तब्बल अठरा प्रकारची नृत्य करत असल्याचे त्याच्या मालकाचा दावा आहे.
देशपातीळवरील घोड्यांच्या नृत्य स्पर्धेसाठी तयार
खाटेवर नाचणाऱ्या या सुर्या घोड्याने नृत्यात अनेकांची खाट पाडत 2019 चेतक फेस्टीवलच पहिले पारीतोषीकही पटकावले आहे. पंजाबहून घेतलेल्या या सुर्या पंजाबी नुकरा जातीचा असून त्याला देशपातीळवरील घोड्यांच्या नृत्य स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी तब्बल तीन वर्षांहून अधिकचा कालावधी लागला आहे. त्याचे मालक त्याची रखरखान अतिशय उत्तम ठेवत असून त्याला संतुलीत आहार दिला जातो. सध्या थंडीचा हंगाम असल्याने त्याच्या रोजच्या आहारात मध , सरसोचे तेल, गुळ, बाजरी आणि रोज दहा बदामाचा खुराकही त्याला दिला जातो. महिन्याला वीस हजार रुपये या सुर्यावर खर्च करुन त्याच्या देखरेखीसाठी खास दोन माणसे त्याच्या दिमतीला देखील असतात. या घोड्यामुळेच देशविदेशात आपल नाव झाल्याने हा आपल्या विकायचा नसून फक्त मोठ्या घोड्यांच्या मेळाव्यात प्रदर्शनासाठी आणले जात असल्याचे याचे मालक बंटीभाई सांगतात. जवळपास 59 इंचाची उंच असलेला हा सुर्या विना लगामही उत्कृष्ठ आणि मोहक नृत्याविष्कार सादर करतो. त्यामुळे कमाईसाठी नव्हे तर फक्त मोठ्या कार्यक्रमांमध्येच नाचवण्यासाठी सुर्याला मालक बाहेर सादर करत असतात.
देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल
डिसेंबरमध्ये घोडेबाजार भरायला सुरुवात होते. बाजारात उंची किमतीचे दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारासाठी अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. या बाजारात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.