केळी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव,उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत; कोट्यवधी रुपयांचे नुकसान
नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला. शेकडो एकरवरील केळी पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचं समोर आले आहे.
नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेतले जाते. मात्र या वर्षी जळगाव (Jalgaon) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात केळीच्या बागांवरसी एम व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून बागेत मोठ्या प्रमाणात मर दिसून येत आहे.शकडो हेकटर क्षेत्रावर याचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी पिके उपटून फेकत आहेत
उत्तर महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी केळी उत्पादक शेतकरी काहींना काही कारणांनी अडचणीत सापडत असतो. मागील वर्षी केळी पिकावर मोठ्या प्रमाणात सी एम व्ही म्हणजेच कुकुंभर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान केळी उत्पादक शेतकऱ्यांचे झाले होते. यातून सावरत नाही तो यंदा पुन्हा एकदा नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला. शेकडो एकरवरील केळी पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचं समोर आले आहे. महिनाभर पावसाने फिरवलेली पाठ आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
रोगामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही
केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी खर्च केलेला पैसाही मिळणार नसल्याने शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. अमित पाटील या शेतकऱ्याने आपल्या चार एकर केळी पिकासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केलेत. मात्र या केळीवर आलेल्या रोगामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे.
राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे
दरवर्षी केळी उत्पादक शेतकरी कर्ज किंवा विविध रोगांनी अडचणी देत असतो केळीवर संशोधन होण्यासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्राची गरज आहे. राज्यातील पपई केळी मिरची कांदा टमाटा उत्पादक शेतकरी काही ना काही कारणांनी अडचणीत आहे. विविध विषयांवर राजकीय भाष्य करणाऱ्या राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही बोलले पाहिजे हीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जळगावसह नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं क्षेत्र
जळगावसह नंदुरबार, धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता मान्सूनच्या तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उत्पादित केलेली केळी ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या वादळात उद्धवस्त झाली आहे. वादळ इतके भीषण होते की शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे.
हे ही वाचा :