Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
![Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत impact of changing climate on rabi crops in Nandurbar Nandurbar News : नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/07/3907c8d6ed2390f61bcdbf8b1112ed821670395185133339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar Agriculture News : राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. सध्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळं गारठा कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
वातावरणातील बदलांचा शेती पिकांना फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तर दुसरीकडं अजून चार ते पाच दिवस हा वातावरणातील बदल राहण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीनं व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळं यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पीकं परतीच्या पावसामुळं वाया गेली. अशा स्थितीत राज्यातील शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरभरा ज्वारीसह फळ पिकांनाही फटका बसण्याची शक्यता
रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारीच्या पिकांवर बदलत्या हावामानाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच इतर फळ पिकांवर देखील ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळ फळ उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.
अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका
यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. कापूस, सोयाबीन यासह फळ पिकांचे नुसकाल झाले आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Soyabean Price : आठवडाभरात सोयाबीनच्या दरात 900 रुपयांची घसरण, नंदूरबार बाजार समितीत आवक कमी, शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)