एक्स्प्लोर

Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य

Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: अखेर बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरनं इन्स्टा पोस्ट करत विद्यार्थी आंदोलनावर आपलं मत मांडलं आहे. 

Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: देशभरात केंद्रीय शिक्षण (Union Education Minister Dharmendra Pradhan) मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सारे विद्यार्थी एकटवले असून जोरदार आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि एकंदरीतच शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींना पाठींबा दिला आहे. तर, कित्येक सेलिब्रिटी विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनासाठी थेट मैदानात उतरलेले. पण, काही सेलिब्रिटींनी मात्र, या आंदोलनाबाबत चकार शब्दही काढला नव्हता. त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात होतं. अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर मौन बाळगलं होतं. यामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) कुटुंबीयांपैकी एक असलेल्या कपूर कुटुंबीयांचाही (Kapoor Family) समावेश आहे. त्यानंतर कपूर कुटुंबीयांची सून आलिया भट (Alia Bhat) हिनं विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट करुन आपला पाठींबा दर्शवला आणि त्यापाठोपाठ आता करिना कपूरनंही (Kareena Kapoor Khan) इन्स्टा पोस्ट करत विद्यार्थी आंदोलनावर आपलं मत मांडलं आहे. 

आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) करीना कपूर खान हिनं सोशल मीडियावरून एक पोस्ट करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल आणि त्यांच्या मेहनतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता मी या विषयावर अधिक काळ शांत राहू शकत नाही...", असं म्हणत करीना कपूरनं आपलं मत मांडलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नेमकं काय म्हणाली? (Kareena Kapoor Khan On Student Protest)

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर म्हणाली की, "मी या विषयावर गेल्या काही दिवसांपासून विचार करत होते, पण आता अधिक शांत राहणं शक्य नाही. आपलं मत मांडण्यासाठी धडपडणाऱ्या इतक्या मोठ्या संख्येतील तरुणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे... आणि तसं केलंही जाऊ नये. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, एका मुलाच्या आयुष्यात शिक्षणाचं स्थान काय असतं. शिक्षण त्यांना आत्मविश्वास देतं, एक नवी आशा देतं. उद्याचा दिवस आजपेक्षा नक्कीच चांगला असेल, असा विश्वास ते कुटुंबाला देतं..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे बोलताना करिना कपूर आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली की, "पण शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं, जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि कर्तृत्व यांना काहीही किंमत उरलेली नाही, असा संशय जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होतो, तेव्हा त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जातो. आपली मेहनत पुरेशी ठरेल की नाही, असा विचार कोणत्याही विद्यार्थ्याला करावा लागू नये. विद्यार्थ्यांना अशी पारदर्शक यंत्रणा हवी ज्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील आणि तिथे कर्तृत्वाला खरी किंमत असेल, कष्टाचं चीज होईल आणि प्रत्येक मुलाला समान संधी मिळेल. ही कोणतीही मोठी मागणी नाही, ही पायाभूत गरज आहे,"

"जेव्हा संपूर्ण पिढी एकत्र येऊन स्वतःच्या भविष्याबद्दल बोलते, तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेतो म्हणजे, त्यांच्यावर उपकार करत नाही; तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली मुलं आपल्याकडे अत्यंत बारकाईनं पाहत असतात. आपण आता काय भूमिका घेतो, यावरूनच त्यांना कळेल की, निष्पक्षता आणि विश्वास या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत. ती मुलं उद्याच्या दिवसाची तयारी करत नसून, तीच आपला उद्याचा भविष्यकाळ आहेत...", असं करीना कपूर-खान म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

R. Madhavan Shared Delay Post On CJP Student Protests: उशिरा का होईना, आर. माधवनला विद्यार्थी आंदोलनावर बोलायला सुचलं, त्यानंतरही नेटकऱ्यांनी 'ते' हेरलं अन् झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget