एक्स्प्लोर

भानामती केली म्हणून एकाची हत्या, नांदेडमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Nanded News Update : नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, भानामती केली म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे.

Nanded Latest Crime News Update : नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, भानामती केली म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन व्यक्तींना तात्काळ अटक केली आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  

नांदेड जिल्ह्यातील गागलेगाव तालुका बिलोली येथे ही धक्कादायक घटना घडली. येथील हनमंत काशीराम पांचाळ यास तू भानामती केली असे म्हणून काही लोकांनी चिंचेच्या झाडाला बांधले. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये हनमंत काशीराम पांचाळ यांचा मृत्यू झाला. ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, गागलेगाव तालुका बिलेली येथील हनमंत काशीराम पांचाळ (वय 85 वर्ष ) यास तू वामन डुमणे यांच्या मुलीवर कर्णी, भानामती केली, असा आरोप करण्यात आला.  रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे रा. गागलेगाव व दयानंद वाघमारे रा. कागंठी या तिघांनी संगणमत करून त्यांच्याच घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाला पांचाळ यास बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये पांचाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मारोती नागनाथ पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे, आणि दयानंद वाघमारे या तिघांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रजिस्टर नंबर 33/2023 कलम 302 ,342, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे हे करत आहेत. ही घटना घडल्याचे समजताच धर्माबाद येथील उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यास भेट देऊन सदरील घटनेची सविस्तर माहिती घेतली.

सदरील घटनेतील तीन आरोपीपैकी वामन डुमणे व दयानंद वाघमारे या दोघांना रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रत्नदीप वामन डुमणे यांचा पोलीस शोध घेत आहेत. हनमंत काशीराम पांचाळ यांचे बिलोली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गागलेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांनी हौतात्म्य पत्करले. 21 व्या शतकात आपण वावरत आहोत.शाहू, फुले, आंबेडकरांचा आपण वारसा सांगतो. अशा समाजात या प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राम शिंदे यांनी दिली आहे. 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget