Drone Use in HSC Exam : बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर, राज्यातील पहिलाच प्रयोग
HSC Exam : परीक्षा होईपर्यंत हे ड्रोन परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला नजर ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील हा आतापर्यंतचा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
Drone Use in HSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना (HSC Exam) आजपासून सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये (Exam) कॉपी रोखण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील एका शाळेत चक्क कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा (Drone) वापर करण्यात येत आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील पानभोसी गावात असलेल्या सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर येतात. ग्रामीण भागात परीक्षा केंद्रावर जीव धोक्यात घालून कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. परीक्षा केंद्रात कॉपी देण्यासाठी बाहेरून कोणी येऊ नयेत, तसेच कोणी आल्यास त्याची ओळख पटवण्यासाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. परीक्षा होईपर्यंत हे ड्रोन परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला नजर ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील हा आतापर्यंतचा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
मराठवाड्यातील 690 परीक्षा केंद्रांवर एकूण 2 लाख 75 हजार विद्यार्थी परीक्षा देणार
आजपासून (बुधवारी) बारावीची परीक्षा होत असून, इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असणार आहे. यासाठी मराठवाड्यातील 690 परीक्षा केंद्रांवर एकूण 2 लाख 75 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मराठवाड्यात राज्य मंडळाचे छत्रपती संभाजीनगर आणि लातूर असे दोन विभाग आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्हे येतात. तर लातूर विभागात लातूर, धाराशीव, नांदेड जिल्हे येतात. या दोन्ही विभागातून बारावी परीक्षेला यंदा एकूण 2 लाख 75 हजार विद्यार्थी बसले आहेत. तर, परीक्षा केंद्रांची संख्या 690 इतकी आहे.
हिंगोलीत 37 परीक्षा केंद्रावर परीक्षा
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज 37 परीक्षा केंद्रावर बारावीच्या बोर्डाची परीक्षा घेतली जात आहे. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला हिंगोली जिल्ह्यातील 14500 विद्यार्थी समोर जाणार असून, कॉपी टाळण्यासाठी 37 बैठेक पथक सुद्धा या परीक्षा केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल स्मार्टवॉच सुद्धा बाहेर ठेवावी लागणार आहे. हिंगोली शहरातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याना गुलाबाचे फुल देत शिक्षकांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI