Nana Patole : महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून कीव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही : नाना पटोले
Nana Patole : भारतीय जनता पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच हे केले आहे. नेत्यांवर डाका टाकण्याचे काम सुरु आहे, असे नाना पटोले म्हणालेत.
Nana Patole : महायुतीने राज्यसभा उमेदवारांची (Candidate For Rajya sabha) यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर होताच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधलाय. "महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येत आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी जीव ओतून काम केले, त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, आयात केलेल्या नेत्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच हे केले आहे. नेत्यांवर डाका टाकण्याचे काम सुरु आहे, असे नाना पटोले म्हणालेत.
भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार
भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज (दि.14) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलीये. भारतीय जनता पक्षाकडून आज याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. महायुतीकडून एकूण चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर
भाजपचे उमेदवार - अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे
शिंदे गटाचे उमेदवार - मिलिंद देवरा
अजित पवार गट - प्रफुल्ल पटेल
शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवट दिवस आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिलींद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून अद्याप कोणालाही उमेदवारी जाहिर करण्यात आलेली नाही.
BJP releases another list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
— ANI (@ANI) February 14, 2024
Party president JP Nadda from Gujarat
Ashok Chavan, Medha Kulkarni from Maharashtra pic.twitter.com/eIZXmvyjcn
माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस ; मेधा कुलकर्णी
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला आज उमेदवारी देण्यात आली. माज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचे मी आभार मानते. सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेसाठी संधी दिली, अशी प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या