एक्स्प्लोर
जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही : नितीन गडकरी
आधी स्वतःच घर, मुलं कुटुंब सांभाळा मग देश सांभाळा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

नागपूर : आधी स्वतःच घर, मुलं कुटुंब सांभाळा मग देश सांभाळा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नागपूर येथे काल अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले. गडकरी म्हणाले, "भारतीय जनता पक्षासाठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही".
'आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, मुलंबाळं सांभाळा आणि मग भाजपचं किंवा देशाचं काम करा', असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
