एक्स्प्लोर

नागपूरात काही तासांत दोन कोरोना बाधित वृद्धांची आत्महत्या, नैराश्येतून टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज

नागपुरात एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने दोन कोरोना बाधित वृद्धांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. नैराश्येतून या दोघांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

नागपूर : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच नागपुरात घडलेल्या घटनांनी संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नागपुरात अवघ्या काही तासांच्या अंतरावर दोन कोरोना बाधित वृद्धांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. 

पहिली घटना नागपूरमधील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय म्हणजेच, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्येच घडली. 81 वर्षांच्या पुरुषोत्तम गजभिये नावाच्या वृद्ध व्यक्तीनं वॉर्डच्या बाथरूममध्ये काल संध्याकाळी गळफास लावून घेतला. पुरुषोत्तम गजभिये यांना कोरोनाचं निदान झाल्यांनतर 26 मार्च रोजीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी बाथरूममध्ये गेलेले पुरुषोत्तम गजभिये बराच वेळ बाहेर न आल्याने रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्याला शंका आली. त्याने डॉक्टरांना ही बाब सांगितली त्यानंतर कोरोना बाधित वृद्धाच्या आत्महत्येची घटना समोर आली. 26 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केल्यांनतर पुरूषोत्तम यांची अवस्था जाणून घेण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयाकडे फिरकलेही नव्हते. त्यामुळे नैराश्यात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

दुसरी घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत पंच्याशी प्लॉट परिसरात घडली. वसंतराव कुटे या 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं आज सकाळी राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. वसंतराव कुटे यांना 26 मार्च रोजी कोरोनाची लागण  झाल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव कुटे आधीच मुतखड्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत आहे. आजारपणातील नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती अजनीचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे. 

नागपुरात गेलं काही आठवडे कोरोनाचा थैमान सुरु आहे. रोज तीन आणि चार हजारांच्या घरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शिवाय मृतांचा आकडाही वाढताच आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आता लोकांच्या मनावर खासकरून वृद्धांच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पाडत आहे का? आणि कोरोनाच्या तणावात आणि भीतीमुळे लोकं आत्महत्या करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही तासांच्या फरकानं घडलेल्या दोन आत्महत्यांच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mahajyoti-Vanarti Exams : पुण्यासह नांदेडच्या परीक्षा केंद्रावर पुन्हा परीक्षा होणार, महाज्योती अन् वनार्टी संस्थेमार्फत स्पष्टीकरण; अहवालानंतर दोषींवर कारवाईचाही शब्द
पुण्यासह नांदेडच्या परीक्षा केंद्रावर पुन्हा परीक्षा होणार, महाज्योती अन् वनार्टी संस्थेमार्फत स्पष्टीकरण; अहवालानंतर दोषींवर कारवाईचाही शब्द
Mohan Bhagwat: विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गौ विज्ञान केंद्राला ‘गो टुरिझम’चा दर्जा; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, 'समाजाची गरज पाहता गौ-सेवेचे हे कार्य पुरेसे नाही, तर...'
विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गौ विज्ञान केंद्राला ‘गो टुरिझम’चा दर्जा; सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, 'समाजाची गरज पाहता गौ-सेवेचे हे कार्य पुरेसे नाही, तर...'
Parinay Fuke On Rohit Pawar : राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
Nagpur Crime News: दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न? संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं!
दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न? संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget