एक्स्प्लोर

Teachers Constituency Elections : काँग्रेसचं ठरलं; नागपुरात 'या' उमेदवाराला देणार समर्थन, विश्वसनीय सूत्रांची माहिती

Nagpur : गोंधळात कॉंग्रेस कोणाला समर्थन देणार याबद्दल तर्क लढविण्यात येत होते. मात्र 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कॉंग्रेसने कोणत्या उमेदवाराला समर्थन देणार हे ठरविले आहे.

Teachers Constituency Elections Nagpur : गेल्या अनेक दिवसांपासून तळ्यात-मळ्यात केल्यानंतर कॉंग्रेसने (Congress) नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र गोंधळात कॉंग्रेस कोणाला समर्थन देणार याबद्दल तर्क लढवण्यात येत होते. मात्र एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसने कोणत्या उमेदवाराला समर्थन देणार हे ठरवले आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर कॉंग्रेस आपला पाठिंबा कोणाला आहे हे जाहीर आहे.

प्राप्त माहितीनुसार कॉंग्रेसने आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन देणार असल्याची माहिती आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर कॉंग्रेस आपली भूमिका जाहीर करणार आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास याची अधिकृत घोषणा पक्षाच्यावतीने करण्यात येणार आहे. मात्र या संदर्भात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फार्म्युला वेळेवर ठरल्याने हा घोळ झाल्याचे विदर्भ माध्यमिकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे अनिश्‍चिततेचा खेळ होऊन बसली आहे. कॉंग्रेसचा उमेदवार कोण किंवा पाठिंबा कुणाला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. असे असताना सतीश इटकेलवार यांनी  उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रणधुमाळीत धूम उडवून दिली होती. "या निवडणुकीची तयारी आजची नाही, तर गेल्या वर्षभरापासून तयारी करत आहे. माझी दावेदारी म्हणजे आमच्या पक्षाचे मन वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला जवळपास सर्व संघटनांचे समर्थन मिळाले आहे. संघटनांच्या प्रमुखांनी जरी सांगितले नसले, तरी त्यांच्या लोकांनी ही निवडणूक लढवण्यासाठी मला सांगितले आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र आज ते उमेदवार अर्ज मागणे घेणार आहेत.

महाविकास आघाडीचे 4 उमेदवार

महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या गटांचे चार उमेदवार आता रिंगणात आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, उद्धव ठाकरे गटाचे गंगाधर नाकाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सतीश इटकेलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते आणि ओबीसी सेलचे प्रमुख आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करुन त्यांनी महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. आता पक्षाने काय ते ठरवायचे आहे आणि त्यासाठी आज, 16 जानेवारीपर्यंत वेळ आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

ही बातमी देखील वाचा...

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बॅकफूटवर; आज ठरणार खरा सामना

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget