एक्स्प्लोर
घराबाहेरचा स्लायडिंग गेट कोसळून 18 महिन्यांच्या चिमुरडीचा करुण अंत
नागपुरात 18 महिन्यांच्या निहारिकाचा काका स्लायडिंग गेट बंद करत असताना ते तिच्या अंगावर पडलं. गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

नागपूर : घरासमोर लावलेला स्लायडिंगचा लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. 18 महिन्यांच्या निहारिका माहुले हिला या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले.
रवी आणि निकिता माहुले या दाम्पत्याची निहारिका ही एकुलती एक लेक. हुडकेश्वर परिसरातील चक्रपाणीनगरमध्ये हेडाऊ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या माहुले कुटुंबासोबत बुधवारी रात्री अघटित घडलं. निहारिकाचा काका पंकज रात्री घरी पोहचला. तो गेटमधून बाईक घरात घेत होता. तितक्यात निहारिकाने काकाला भेटण्यासाठी धाव घेतली. पंकज स्लायडिंग गेट बंद करत असताना ते निहारिकाच्या अंगावर पडलं.
Killer Gate | स्लायडिंग गेट अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू | स्पेशल रिपोर्ट | नागपूर
पंकजने आरडाओरड करुन सर्वांना बोलावलं. सर्वांनी निहारिकाच्या अंगावर पडलेला गेट हटवला, मात्र या दुर्घटनेत निहारिका गंभीर जखमी झाली होती. तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा गुरुवारी मृत्यू झाला.
लाडक्या निहारिकाच्या मृत्यूने माहुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काका पंकज तर या घटनेनंतर सुन्नच झाला आहे. लहानगे घरी असताना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला त्यांची काळजी घेण्याची गरज असल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
