Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : मलिदा खाल्ल्यामुळेच समृद्धीला खड्डे पडले, कंत्राट देताना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले : विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) खड्डा पडलेला दिसून आलाय. यापूर्वी या (Samruddhi Expressway) महामार्गावर अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे.
Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) खड्डा पडलेला दिसून आलाय. यापूर्वी या (Samruddhi Expressway) महामार्गावर अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. दरम्यान, महामार्गावर खड्डे पडल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिदा खाल्ल्यामुळेच समृद्धीला खड्डे पडले, कंत्राट देताना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले, असा आरोप वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, पंतप्रधानांना बोलावून समृद्धीचा घाईघाईने उद्घाटन करण्यात आलं. समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या. मोठमोठे अपघात झाल्यावर सुद्धा उपाययोजनाची आवश्यकता होती. केलेले काम घाईघाईत केले ते निकृष्ट दर्जाचे होते हे समोर आले आहे. तेव्हा बोंबाबोंब झाली आणि आज प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता जनतेला कळले आहे.
कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी टेंडर
समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्ले गेले, कंत्राट देताना समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले. आता समृद्धीवर गाडी खाली जाऊ नये म्हणून चारही बाजूने 700 किलोमीटरच्या रस्त्याला 2400 कोटीचा टेंडर काढण्यात आलं आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने सेफ्टी वायर लावले जाणार असून याची किंमतही फार कमी होती. पण विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी टेंडर आता काढले गेले आहे. समृद्धीला मलिदा खाल्ल्यामुळेच खड्डे पडले आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.
शिंदे गटातील आता सगळेच हिरो झाले आहेत. आता त्यांची वृत्ती महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे. सर्व महाभाग आहेत. शिंदे सोबतच्यांना कायदा म्हणजे यांच्या बापाची मालमत्ता असल्यासारखा वाटायला लागले आहे. जनता यांची गुलाम आहे, अशा पद्धतीने काम चालले आहे, संजय गायकवाडाने आदिवासी महिलेची जमीन हडपली, पैसे न देता फार्म हाऊस बांधला आणि पैसे मागितले तर मारहाण केली. हे आदिवासी समाजावर आणि आदिवासी महिलेवर अन्याय करणारे आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
रामदास कदम यांना उशिरा जाग आली
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अनिल देशमुख यांनी आरोप केले त्यावर मी भाष्य करू शकत नाही. मात्र त्यांच्यावर जे आरोप होते, जी काही शिक्षा त्यांना झाली, ते राजकीय स्वरूपाचे आरोप होते, हे स्पष्ट झाले आहे. चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही. रामदास कदम यांना उशिरा जाग आली. कारण ते फडणवीसांसोबत मंत्री असताना राजीनामे खिशात घेऊन फिरायचे. आम्ही भाजप सोबत राहू शकत नाही आणि यांच्यासोबत नांदू शकत नाही असे सांगायचे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाताना ते कुठल्या विश्वासात वावरत होते, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या