एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंना पेन्ग्विन तर राज्य सरकारला औरंगजेब म्हणणाऱ्या समीत ठक्करला पुन्हा पोलीस कोठडी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य सरकारवर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या समीत ठक्करला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागपूर : ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्कर या तरुणाला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपूर पोलिसांनी 24 ऑक्टोबरला समीत ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरला न्यायालयाने समीत ठक्करला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर काल संध्याकाळी पुन्हा एकदा समीत ठक्करला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तेव्हा या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत न्यायालयाने समीत ठक्करला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अवघ्या 32 वर्षांच्या समीत ठक्करला ट्विटर वर तब्बल 60 हजार लोकं फॉलो करतात. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे समीतला अटक झाल्यापासून राज्यातील भाजप नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत आम्ही समीत ठक्करच्या बाजूने मैदानात आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याच वेळेस समीत आमचा कार्यकर्ता नाही, असेही भाजपने स्पष्ट केले होते. जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक तरुण सरकारवर मुद्देसूद टीका करत असेल, सरकारच्या चुका चव्हाट्यावर आणत असेल आणि सरकार त्याला अटक करत असेल. तर त्या तरुणाच्या बाजूने आम्ही उभे राहू अशी प्रतिक्रिया भाजपने दिली होती.

आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक, पंतप्रधान मोदी करतात फॉलो

गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर समीत ठक्करला पाठिंबा दर्शवत "फ्री समीत ठक्कर" हे हॅशटॅग वापरत ट्विट केले आहे. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून ट्विटरवर भाजप आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये आधीच वाद प्रतिवाद सुरु आहे. आता समीतच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाल्याने समीत ठक्करचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

साधारणपणे आयटी अॅक्टच्या प्रकरणात पोलीसही जास्त पोलीस कोठडीची मागणी करत नाहीत. मात्र, समीतच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी या प्रकरणात अजून तपास पूर्ण झालेला नाही, आरोपीकडून अजून माहिती घेणे शिल्लक असल्याचा तर्क न्यायालयापुढे मांडला गेला. यावरही ट्विटरवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत, हे प्रकरण शिवसेनेच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्यामुळे नागपूर पोलीस जाणूनबुजून समीत ठक्करच्या जामिनाला विरोध करत असल्याचे काहींचे मत आहे.

कोण आहे समीत ठक्कर? 32 वर्षांचा नागपूरचा तरुण समीत ठक्कर ट्विटर वर प्रचंड सक्रिय आहे. नागपूरच्या व्हिएमवी कॉलेजमधून त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले असून त्याच्या कुटुंबाचा नागपुरात ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. समीतचे ट्विटर वर 60 हजार फॉलोवर्स आहेत. समीत जरी भाजप नेते फोलो करत असले तरी समीत आमचा कार्यकर्ता नाही, तो पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावर पक्षाशी थेट संबंधित नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर समीत भाजपच्या आयटी सेलचा कार्यकर्ता असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. समीतचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.

मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यावर टीका गेले अनेक आठवडे समीत ठक्कर महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत होता. कोरोनाचा वाढत संक्रमण असो, वैद्यकीय सेवांमधील गौडबंगाल असो, पूर्व विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या सर्व मुद्द्यांना घेऊन त्याने अनेक ट्विट्सच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली होती. एवढेच नाही तर ठाकरे सरकारचा उल्लेख सतत मॉर्डन औरंगजेब, पॉवरलेस सरकार असा ही केला होता. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना छोटा पेंग्विन संबोधत ट्विटरवर अनेकवेळा त्यांची खिल्लीही उडविली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी समीत ठक्कर विरोधात 12 ऑगस्टला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी 24 ऑक्टोबरला त्याला गुजरातमधील राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक,पंतप्रधान मोदी करतात फॉलो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?9 Seconds Superfast News : 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 20 Sep 2024ABP Majha Headlines 10 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Embed widget